OTT Releases This Week : OTT वर ‘या’ आठवड्यात मिळणार रोमान्स, क्राईम आणि सस्पेन्ससह मनोरंजनाचा भारी डोस, एकदा लिस्ट बघाच...
OTT Releases This Week 23 June To 29 June Saam Tv
मनोरंजन बातम्या

OTT Releases This Week : OTT वर ‘या’ आठवड्यात मिळणार रोमान्स, क्राईम आणि सस्पेन्ससह मनोरंजनाचा भारी डोस, एकदा लिस्ट बघाच...

Chetan Bodke

ओटीटी हे माध्यम प्रेक्षकांचे मनोरंजनाचे उत्तम साधन आहे. ओटीटीवर प्रेक्षकांना वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट, वेबसीरीज आणि वेब शो पाहायला मिळतात. प्रत्येक आठवड्यात प्रेक्षक ओटीटीवर अनेक धमाकेदार चित्रपट आणि सीरिज रिलीज होण्याची वाट पाहत असतात. अशा प्रेक्षकांसाठी या आठवड्यात एकापेक्षा एक कलाकृती ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत.

नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ, झी ५ वर प्रदर्शित होणारे चित्रपट आणि सीरिज तुमचा वीकेंड खास बनवतील. या वीकेंडला ओटीटीवर ॲक्शन, हॉरर, सस्पेन्स आणि कॉमेडी असे सर्व जॉनरमधील चित्रपट ओटीटीवर येत आहेत. कोणते नवीन चित्रपट आणि वेब सीरिज कुठे आणि कधी प्रदर्शित होणार आहेत ते जाणून घेऊयात.

Just To See You

Just To See You- Playflix

चायनामधील प्रसिद्ध वेब शो लवकरच भारतात प्लेफ्लिक्स (Playflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. प्रेम आणि फ्रेंडशिपवर आधारित असलेल्या ह्या सीरिजने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या सीरीजमध्ये प्रमुख भूमिकेत चीनमधील कलाकार आहेत.

Rautu Ka Raaz

Rautu Ka Raaz- Zee 5

क्राइम ड्रामावर आधारित असलेला 'रौतु का राझ' (Rautu Ka Raaz) हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.. हा चित्रपट 'झी ५' या ओटीटीवर रिलीज होणार आहे. नवाझुद्दिन सिद्दीकी, अतुल तिवारी, राजेश कुमार आणि नारायणी शास्त्री हे स्टारकास्ट प्रमुख भूमिकेत आहे.

Sharma Ji Ki Beti

Sharma Ji Ki Beti- Amazon Prime Video

फॅमिली ड्रामा असलेला 'शर्माजी की बेटी' (Sharma Ji Ki Beti) हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट तुम्ही ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकाल. या चित्रपटात साक्षी तंवर, दिव्या दत्ता आणि सैयमी खेर प्रमुख भूमिकेत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report: पृथ्वीवर आदळणार लघुग्रह? मानवाचं अस्तित्व धोक्यात?

Woman Dance Video : 'आगे है बरसात, पीछे है...'; भरपावसात महिलेचा भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून म्हणाल, 'चाक धूम धूम...'

Special Report: चमचमीत पाणीपुरी खाताय, सावधान!

Special Report: विजयाचा उन्माद की जीवघेणा अतिउत्साह?

Special Report: 3 महिन्यांसाठीच 'लाडकी बहीण'? योजनेच्या कार्यकाळावरून वाद

SCROLL FOR NEXT