OTT Release This Week Saam Tv
मनोरंजन बातम्या

OTT Release This Week: खूपच जबरदस्त असणार हा आठवडा, रिलीज होणार 'या' ६ वेबसीरिज आणि चित्रपट

OTT Film And Seried Release: या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोण कोणते चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होणार आहेत त्याबद्दल घ्या जाणून...

Priya More

OTT Platform:

चित्रपट (Movie) आणि वेब सीरीज (Web Series) प्रेमींसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म हा उत्तम पर्याय आहे. ओटीटीवर (OTT Platform) नवीन चित्रपट आणि वेब सीरिजच्या रिलीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. अशामध्ये ओटीटीवर नवीन वेबसीरीज आणि चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांसाठी हा आठवडा खूपच खास असणार आहे.

या आठवड्यात अनेक जबरदस्त वेब सीरिज आणि चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. ज्या तुम्ही घरी बसून आरामात पाहू शकता. या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोण कोणते चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होणार आहेत त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत...

हॉस्टल डेज सीजन ४ - २७ सप्टेंबर (अमेजन प्राइम)

वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे जीवन कसे असते हे पाहायचे असेल तर 'हॉस्टेल डेज सीझन ४' ही वेबसीरिज तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. २७ सप्टेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म Amazon Prime वर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे.

कुमारी श्रीमती- २८ सप्टेंबर (प्राइम व्हिडीओ)

तुमची विचारसरणी बदलेल अशी नवीन कथा तुम्ही शोधत असाल तर 'कुमारी श्रीमती' तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकते. ही वेबसीरिज २८ सप्टेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म Amazon Prime वर रिलीज होईल.

एजंट - २९ सप्टेंबर (Sony Liv)

तुम्हाला दोन स्टार्सचा डबल ड्रामा पाहायचा असेल तर २९ सप्टेंबरला रिलीज होणारा 'एजंट' तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. तुम्ही ते सोनी लिववर पाहू शकता.

चूना - 29 सप्टेंबर (Netflix)

तुम्हाला काही वेगळ्या वेब सीरिज बघायच्या असतील तर 'चूना' वेब सिरीज तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. ही कथा अशा लोकांची आहे जे काही विशेष करू शकत नसताना दरोडा टाकण्याचा प्लॅन आखतात. २९ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे.

तुमसे ना हो पायेगा - 29 सप्टेंबर (डिस्ने प्लस हॉटस्टार)

महिमा मकवानाचा 'तुमसे ना हो पायेगा' ही वेब सीरिज 29 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. महिमाशिवाय गौरव पांडे, गुरप्रीत सैनी आणि करण जोतवानी मुख्य भूमिकेत आहेत. डिस्ने प्लस हॉटस्टारवर २९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

चार्ली चोप्रा अँड द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली - २७ सप्टेंबर (Sony Liv)

जर तुम्ही सस्पेन्सने भरलेल्या कथेच्या शोधत असाल तर 'चार्ली चोप्रा अँड द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली' हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकते. हा चित्रपट 27 सप्टेंबर रोजी Sony Liv वर प्रदर्शित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

SCROLL FOR NEXT