Holi Special Film's Watch On OTT Platforms Saam Tv
मनोरंजन बातम्या

Holi 2024: होळीनिमित्त ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका, घरबसल्या ओटीटीवर पाहा 'हे' चित्रपट

Holi Special Film's: होळीच्या आणि धुळवडीच्या दिवशी तुम्ही खास ‘होळी स्पेशल’ चित्रपट पाहू शकता. जाणून घ्या यादी...

Chetan Bodke

Holi Special Film's Watch On OTT Platforms

येत्या विकेंडला म्हणजेच, २४ आणि २५ मार्चला सर्वत्र देशभरात होळीचा सण साजरा केला जाणार आहे. होळीची तयारी सर्वत्र सुरू आहे. होळी आहे म्हटल्यावर, अनेक जण विकेंडसाठी बाहेर जाण्याचा प्लॅन करीत असतात. यावेळी तुम्ही धुळवड खेळण्यासोबतच मनोरंजन म्हणून चित्रपट पाहूनही सण साजरा करू शकता.

प्रेक्षकांचे मनोरंजनाचे माध्यम बदलले आहे. प्रेक्षकांचा कायमच ओटीटीवर चित्रपट पाहण्याचा कल सर्वाधिक असतो. अशातच या विकेंडच्या, होळीच्या आणि धुळवडीच्या दिवशी तुम्ही खास ‘होळी स्पेशल’ चित्रपट पाहू शकता. जाणून घ्या यादी... (Bollywood)

Sholay

शोले- (Sholay)

70 च्या दशकात रिलीज झालेल्या ‘शोले’ (Sholay) चित्रपटाची आजही प्रेक्षकांमध्ये क्रेझ कायम आहे. या चित्रपटामध्ये बिग बी बच्चन, हेमा मालिनी, जया बच्चन, धर्मेंद्र यांच्यासह अनेक तगडी स्टारकास्ट मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट तुम्ही ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ’ (Amazon Prime Video) या ओटीटीवर पाहू शकता.

Baghban

बाघबान- (Baghban)

बिग बी अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी स्टारर ‘बाघबान’ (Baghban) चित्रपट पाहू शकता. हा चित्रपट तुम्ही ‘डिज्ने प्लस हॉटस्टार’ (Disney Plus Hotstar) या ओटीटीवर पाहू शकता. (Bollywood Film)

Silsila

सिलसीला- (Silsila)

अमिताभ बच्चन, जया बच्चन, रेखासह अनेक दिग्गज स्टारकास्ट असलेला चित्रपट म्हणजे ‘सिलसीला’ (Silsila) होय. हा चित्रपट 1981 मध्ये रिलीज झालेला आहे. हा चित्रपट तुम्ही ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ’ (Amazon Prime Video) या ओटीटीवर पाहू शकता.

Yeh Jawaani Hai Deewani

ये जवानी है दीवानी- (Yeh Jawaani Hai Deewani)

दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर स्टारर ‘ये जवानी है दीवानी’ (Yeh Jawaani Hai Deewani) पाहू शकता. हा चित्रपट तुम्ही ‘नेटफ्लिक्स’ (Netflix) या ओटीटीवर पाहू शकता. (Bollywood News)

Badrinath Ki Dulhania

बद्रीनाथ की दुल्हनिया- (Badrinath Ki Dulhania)

वरुण धवन आणि आलिया भट्ट स्टारर ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ (Badrinath Ki Dulhania) हा चित्रपट तुम्ही ‘नेटफ्लिक्स’ (Netflix) या ओटीटीवर पाहू शकता.

Goliyon Ki Raasleela Ram-Leela

गोलियों की रासलीला रामलीला (Goliyon Ki Raasleela Ram-Leela)

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण स्टारर ‘गोलियों की रासलीला रामलीला’ (Goliyon Ki Raasleela Ram-Leela) हा चित्रपट तुम्ही ‘जिओ सिनेमा’ (Jio Cinema) या ओटीटीवर पाहू शकता.

Raanjhanaa

रांझना- (Raanjhanaa)

धनुष आणि सोनम कपूरचा स्टारर ‘रांझना’ (Raanjhanaa) हा चित्रपट तुम्ही ‘जिओ सिनेमा’ (Jio Cinema) या ओटीटीवर पाहू शकता. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT