Ram Charan, Karan Johar, Jr NTR and Other Indian Celebrity Received Academy Members Invite
Ram Charan, Karan Johar, Jr NTR and Other Indian Celebrity Received Academy Members Invite Instagram
मनोरंजन बातम्या

Indian Celebrity Become Academy Members : काय सांगता ! करण जोहर, राम चरण, ज्युनिअर एनटीआर यांना ऑस्करचे सदस्यत्व जाहीर

Pooja Dange

Ram Charan, Karan Johar, Jr NTR In Oscars' Academy List : अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने निमंत्रितांची यादी जाहीर केली आहे. एकूण 398 नवीन सदस्य या वर्षी या यादीत सामील होणार आहेत. या यादीमध्ये करण जोहर, आरआरआर अभिनेते राम चरण आणि ज्युनियर एनटीआर, मणिरत्नम आणि बऱ्याच भारतीय सेलिब्रिटींचा समावेश आहे.

टेलर स्विफ्ट, के हुए क्वान, ऑस्टिन बटलर, एबेल मॅकोनेन टेस्फेय "द वीकेंड", स्टेफनी हसू आणि अनेक आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबाबत भारतीय कलाकार सामील होणार आहेत. (Latest Entertainment News)

अकादमीने भारतीय सेलिब्रिटींना आमंत्रित केले आहे

करण, राम आणि ज्युनियर एनटीआर व्यतिरिक्त, या यादीमध्ये सिद्धार्थ रॉय कपूर, दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे, ऑस्कर-विजेते संगीतकार एमएम कीरावानी आणि गीतकार चंद्रबोस यांचा समावेश आहे. यांनी RRR मधील नाटु नाटु ता गाण्यासाठी ऑस्कर जिंकला आहे.

ऑल दॅट ब्रीदस या वर्षीच्या अकादमी पुरस्कारांमध्ये नामांकित झालेल्या डॉक्युमेंटरी निर्माते शौनक सेन आणि सिनेमॅटोग्राफर विभागात एसएस राजामौली यांच्या आरआरआरवर काम केलेले केके सेंथिल कुमार यांचा या यादीत समावेश आहे.

अहवालानुसार, अकादमीमध्ये निवडण्यात येणारे सदस्यत्व 'व्यावसायिक पात्रता, प्रतिनिधित्व, त्यांचे सुरु असलेली कामांचे सादरीकरण आणि वचनबद्धता यावर आधारित आहे.

अकादमीचे सीईओ बिल क्रेमर आणि अकादमीचे अध्यक्ष जेनेट यांग म्हणाले, "या कलाकार आणि व्यावसायिकांचे आमच्या सदस्यत्वात स्वागत करताना अकादमीला अभिमान वाटतो. हे सर्वजण सिनेमॅटिक विषयांमध्ये विलक्षण जागतिक प्रतिभेचे प्रतिनिधित्व करतात आणि कला आणि विज्ञानाच्या आधारे मोशन पिक्चर तसेच जगभरातील चित्रपट चाहत्यांवर प्रभाव पाडतात."

आता, अकादमीचे 10,000 पेक्षा जास्त सदस्य आहेत आणि फक्त त्यांनाच ऑस्कर विजेत्यांना मतदान करण्याची संधी मिळते. पुढील वर्षीचा ऑस्कर सोहळा 10 मार्च रोजी होणार आहे.

दरम्यान, यावर्षी ऑस्करमध्ये अनेक भारतीय सेलिब्रिटींनी छाप पाडली. RRR च्या Naatu Naatu या गाण्याने इतिहास रचला. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट गाण्यासाठी ऑस्कर मिळाला तर गुनीत मोंगाच्या The Elephant Whisperers ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण अडचणींच्या सापळ्यात; सर्व्हर डाऊनमुळे लाडक्या बहिणींचा हिरमोड

Ladki Bahin Yojana: साम टीव्हीच्या बातमीचा दणका! लाडक्या बहिणींची लूट करणाऱ्या तलाठ्यावर निलंबनाच्या कारवाईनंतर थेट FIR दाखल

Spider-Man Thief: मुंबईत 'स्पायडर मॅन' चोर! उंच इमारतींवर चढून करायचा चोरी; असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Leopard Sterilisation: वन्यजीव-मानव संघर्ष वाढणार? बिबट्यांच्या नसबंदीला केंद्राचा नकार, जुन्नरकरांचं टेंशन वाढलं

Legislative Assembly Elections: विधान परिषद निवडणुकीच्या धुमाळीत ५:२५ ची चर्चा; काय आहे ५:२५ चा आकडा?

SCROLL FOR NEXT