Liza Koshy Fall On Red Carpet Saam Tv
मनोरंजन बातम्या

Oscars Award 2024: ऑस्कर अवॉर्डदरम्यान रेड कार्पेटवर जोरात पडली अभिनेत्री Liza Koshy, VIDEO व्हायरल

Liza Koshy Fall On Red Carpet: या अवॉर्ड शोमध्ये विजेत्यांच्या नावाची घोषणा करण्यापूर्वी अनेक स्टार्सनी रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला. याचवेळी एक अभिनेत्री रेड कार्पेटवर पडली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

Actress Liza Video:

96 वा ऑस्कर अवॉर्ड सोहळा (Oscars Award 2024) नुकताच पार पडला. ऑस्कर अवॉर्ड हा जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे. हॉलिवूड (Hollywood) असो किंवा बॉलिवूड (Bollywood) प्रत्येक कलाकाराचे हा अवॉर्ड मिळवण्याचे स्वप्न असते. यावर्षी अनेक स्टार्सचे हे स्वप्न पूर्ण झाले. या पुरस्कार सोहळ्यातील अनेक व्हिडीओ आणि फोटो असध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या अवॉर्ड शोमध्ये विजेत्यांच्या नावाची घोषणा करण्यापूर्वी अनेक स्टार्सनी रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला. याचवेळी एक अभिनेत्री रेड कार्पेटवर पडली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ऑस्कर अवॉर्ड सोहळ्यामध्ये जगभरातील अनेक कलाकार सहभागी झाले होते. या अवॉर्ड सोहळ्यासाठी पोहचलेल्या प्रत्येक कलाकारांनी रेड कार्पेटवर आपली जादू दाखवली. यावेळी 27 वर्षांची अभिनेत्री लिझा कोशी ( Liza Koshy) रेड कार्पेटवर फोटोग्राफर्सला फोटोंसाठी पोझ देत असताना अचानक तिचा तोल जातो आणि ती जमिनीवर पडते. जोरात पडल्यानंतर देखील लिझा स्वत:ला अतिशय व्यवस्थित पद्धतीने हाताळते. तिच्या या कृतीचे कौतुतक होत आहे.

लिझा कोसीने तिच्या किलर लुकसह रेड कार्पेटवर सर्वांचे लक्ष वेधले. लिझाने लाल रंगाचा लाँग ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला होता. यामध्ये ती खूपच क्युट दिसत होती. या लूकमध्ये ती रेड कार्पेटवर पोहोचली. पोज देण्यासाठी ती पुढे आली तेव्हा तिचा पाय घसरला आणि ती जमिनीवर पडली. यावेळी अभिनेत्रीने ही परिस्थिती अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळली.

पडल्यानंतर लिझा स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करते. पडल्यानंतर लिझा देखील हसते आणि म्हणजे सर्वकाही ठिक आहे. त्यानंतर दोघेजण तिच्या मदतीला येतात आणि तिला उभं राहण्यासाठी मदत करतात. यावेळी लिझा म्हणते की, 'तिथे एक मॅनहोल होता. तुम्ही सर्वांनी ते पाहिले?' लिझा पुढे असे देखील म्हणते की, मी ठिक आहे. मी माझ्या घोट्याचा विमा काढला आहे. त्यामुळे ते ठिक आहे.'

यावेळी लिझा एका माध्यम प्रतिनिधीशी संवाद साधते. त्यावेळी ती सांगते की, 'मी ऑस्कर अवॉर्ड शोमध्ये सहभागी होण्यासाठी ती इतकी उत्साही झाली होती की मी रेड कार्पेटवर पडली.', अशी गंमत ती करते. दरम्यान, लिझा कोसी ही एक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबतच युट्यूबर देखील आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या 'प्लेयर्स' या चित्रपटातून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

SCROLL FOR NEXT