Natu Natu Song Kolhapur Connection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Natu Natu Song: आरारारा खतरनाक! ‘RRR’चं समोर आलं खास कोल्हापूर कनेक्शन

RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याचं कोल्हापूर कनेक्शन समोर आले आहे.

Chetan Bodke

Natu Natu Song Kolhapur Connection: सध्या भारतातच नाही तर, जगभरात ‘नाटू नाटू’या गाण्याची सर्वत्र चर्चा होत आहे. ऑस्कर २०२३ मध्ये सर्वोत्कृष्ट मुळ गाण्याचा पुरस्कार मिळाल्यानंतर दिग्दर्शकांनी चित्रपटाच्या आगामी भागाची अर्थात सिक्वेलची घोषणा केली. सोबतच कलाकारांनी गाण्यासाठी घेतलेले कठोर परिश्रमांचीही सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. नुकतंच या गाण्याचे कोल्हापूर कनेक्शन समोर आले आहे. आता तुम्ही म्हणाल हे काय नवं आणलंत. होय, हे खरं आहे, ‘नाटू नाटू’ गाण्याचं सध्या कोल्हापूर कनेक्शन कमालीचं चर्चेत आलं आहे.

RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने ऑस्कर पुरस्कार मिळवून भारतीय चित्रपटसृष्टीला पुन्हा एकदा अढळ स्थान निर्माण करुन दिले आहे. ‘नाटू नाटू’ या गाण्याचा कोल्हापूरसोबत कसा संबंध आहे, चला तर जाणून घेऊया. या ऑस्कर विजेत्या गाण्यावर व्हीएफएक्सच्या माध्यमातून रुपेरी साज चढवण्याचं काम कोल्हापुरात झालं आहे. त्यामुळे या ऑस्कर पुरस्काराचे गाण्यासोबत कोल्हापूरचे जवळचे नाते आहे.

कोल्हापूरच्या रेलिश इन्फोसॉफ्ट कंपनीत ‘नाटू नाटू’ या गाण्यावर बहुतांश भागांमध्ये व्हीएफएक्स इफेक्ट देण्यात आले आहे. कोल्हापूरमधील काही युवकांनी या गाण्याची एडिटींग केल्याने कोल्हापूरकरांसाठीही हा अभिमानाचा क्षण आहे. कोल्हापूर नेहमीच कलेची नगरी म्हणून ओळखली जाते.

कोल्हापूरच्या या रांगड्या मातीतून अनेक दिग्गज कलाकार जन्माला आले आहेत. अनेकांनी विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करून देशाचे नाव समुद्रापार नेले आहे. यामध्ये आता 'RRR' या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याचा समावेश करण्यासाठी हरकत नाही.

‘नाटू नाटू’ गाण्यातील कलाकारांचा डान्सही चर्चेत आहे. या गाण्याची तालीम आणि कार्यशाळा दोन महिने घेण्यात आली. आणि त्यानंतर हे गाणे 15 दिवसांच्या कालावधीत शूट करण्यात आले. ऑस्करमध्ये सादर झालेल्या या गाण्याची 15 दिवसांच्या कालावधीत रियसल करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Govinda: बायकोच्या 'त्या' विधानावरून अभिनेता गोविंदानं मागितली सार्वजनिक माफी, काय आहे प्रकरण?

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

SCROLL FOR NEXT