Onkar Bhojane Saam Tv
मनोरंजन बातम्या

Onkar Bhojane: 'कलाकार म्हणून उत्तम, पण माणूस म्हणून...'; ओंकार भोजनेच्या अनप्रोफेशनल वागण्यावरुन प्रसिद्ध दिग्दर्शक संतापले

Onkar Bhojane: ‘अफरातफरी’च्या प्रमोशनासाठी ओंकार भोजने सहकार्य करत नसल्याचा दावा दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी केला. फोन न उचलणे, प्रमोशनाला हजर न राहणे यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करत ओंकारला अनप्रोफेशनल म्हटले आहे.

Shruti Vilas Kadam

Onkar Bhojane: मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या कलाकारांच्या चित्रपट प्रमोशनातील सहभागावरून चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी ‘देवघर ऑन रेंट’च्या दिग्दर्शक-निर्मात्यांनी अभिनेता अंकित मोहन फोन उचलत नसल्याची तक्रार केली होती. आता आगामी ‘अफरातफरी’ या सिनेमाचे दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी अभिनेता ओंकार भोजने याच्याबाबत अशीच नाराजी व्यक्त केली आहे. ओंकारला सिनेमाच्या प्रदर्शनाची माहिती जूनमध्येच देण्यात आली होती, मात्र प्रमोशनसाठी तो सहकार्य करत नसल्याचा आरोप दिग्दर्शकांनी केला आहे.

दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी ‘महा MTB’ला दिलेल्या मुलाखतीत याबाबत सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले की, सिनेमातील ज्येष्ठ आणि व्यावसायिक कलाकार वेळ पाळतात आणि प्रमोशनसाठी वेळ देतात. संजय नार्वेकर आणि मोहन आगाशे हे असे कलाकार आहेत जे प्रमोशनमध्ये सहभागी असतात. पण, जे त्यांच्या करियरच्या पिकवर आहेत असे कलाकार कधीच त्यात सहभागी होत नाहीत वर खोटं बोलून टाळाटाळ करतात उदाहरणार्थ ओंकार भोजने.

ओंकार भोजनेबद्दल बोलताना मिलिंद कवडे म्हणाले की, ‘अफरातफरी’ ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती ओंकारला जूनमध्येच देण्यात आली होती. त्यानंतर माझे EP, निर्माते आणि मी स्वतः ओंकारशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून त्यांचे फोन उचलले नाही. फोन केल्यानंतर ओंकारकडून ‘दादा मी तुला कॉलबॅक करतो’ असा टेम्प्लेट मेसेज येतो. मात्र, प्रत्यक्षात कॉलबॅक होतच नाही. अखेर निर्मात्यांनी ओंकारला पत्र पाठवून त्याच्या सहकार्याबाबत नाराजी व्यक्त केली.

एका सिनेमासाठी निर्माते करोडो रुपयांची गुंतवणूक करतात, त्यामुळे कलाकारांनी प्रमोशनमध्ये सहकार्य करणे गरजेचे असते. कलाकार प्रत्यक्ष प्रमोशनला येऊ शकत नसला तरी सेल्फी व्हिडीओच्या माध्यमातून सिनेमाचे प्रमोशन करू शकतो. यासाठी त्यांनी मोहन आगाशे हैदराबादमध्ये असतानाही त्यांनी सेल्फी व्हिडीओ पाठवला आणि नंतर स्वतः प्रमोशनमध्ये सहभागी झाले. हे प्रोफेशनलिझम आहे पण तो यातलं काहीच करत नाही.

या अनुभवामुळे पुढील सिनेमात ओंकार भोजनेसोबत मी काम करणार नाही. तो एक कलाकार म्हणून तो उत्तम आहे, चांगलं काम करतो. पण माणूस म्हणून सॉरी, खूप अनप्रोफेशनल,” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold : सोनं-चांदी खरेदीदारांसाठी खूशखबर! चांदी ८००० ने स्वस्त, सोन्याची किंमतही घसरली; पाहा आजचे दर

Supreme Court : मोठी बातमी! मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, राहुल गांधींनाही फटकारले

Shocking : भीषण दुर्घटना! शाळेचे छत कोसळून २९ विद्यार्थ्यांचा मृत्यू; एका शिक्षिकेचाही समावेश

IAS officers Transfer: पुन्हा मोठा प्रशासकीय फेरबदल, ७ आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: डोंबिवलीत एमआयडीसीच्या जलवाहिन्यांना गळती

SCROLL FOR NEXT