Rohit Shetty Birthday saam tv
मनोरंजन बातम्या

Rohit Shetty: करियरमध्ये तुटपुंजी कमाई कमावणारा रोहित आज आहे कोट्याधीश, वडिलांमुळे झाला Action Director

1991 मध्ये 'फूल और कांटे' या चित्रपटातून त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली.

Saam Tv

Rohit Shetty Birthday: बॉलिवूडमध्ये जसे अ‍ॅक्शन हिरो आहेत तसेच या अभिनेत्यांकडून अ‍ॅक्शन दिग्दर्शक देखील आहेत. अॅक्शन दिग्दशर्क म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येणारे नावं म्हणजे रोहित शेट्टी. बॉलिवूडमध्ये अॅक्शन किंग म्हणून प्रसिद्ध असलेला रोहित शेट्टीचा आज वाढदिवस आहे. रोहित शेट्टीचा जन्म 14 मार्च 1973 रोजी मुंबईत झाला.

1991 मध्ये 'फूल और कांटे' या चित्रपटातून त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली. रोहित शेट्टीचा पहिला पगार फक्त 35 रुपये होता. या पैशातून रोहित फक्त जेवणाचा आणि प्रवासाचा खर्च भागात असे. आज रोहित शेट्टी करोडोंचा मालक आहे. रोहित शेट्टीने गोलमाल आणि सिंघम या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

रोहित शेट्टीचे वडील एमबी शेट्टी हे बॉलिवूडचे प्रसिद्ध स्टंटमन आणि खलनायक होते. त्यामुळेच रोहितच्या मनावर आणि हृदयावर अ‍ॅक्शनचा खोलवर ठसा उमटवला. रोहित शेट्टीने लहानपणीच वडिलांचे छत्र गमावले. रोहित शेट्टीने 2003 मध्ये पहिल्यांदा जमीन हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात अजय देवगण, बिपाशा बसू आणि अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटानंतर रोहित शेट्टी आणि अजय देवगण या जोडीने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.

रोहित शेट्टीच्या चित्रपटांमध्ये जबरदस्त अ‍ॅक्शन पाहायला मिळते. हवेत उडणाऱ्या कार, ट्रक तसेच हेलिकॉप्टर यांचा थरार रोहित शेट्टीच्या चित्रपटांमध्ये असतो. सिंघममध्ये रोहित शेट्टीने दाखवलेली फाईट आणि अ‍ॅक्शन प्रेक्षकांना खूप आवडली. यानंतर रोहित शेट्टीने चेन्नई एक्सप्रेस, दिलवाले आणि सिंबामध्येही धमाकेदार अ‍ॅक्शन सीन चित्रित केले होते. रोहित शेट्टीच्या चित्रपटांमधील फाईट सीन्स खूप सुंदर असतात.

रोहित शेट्टीनेही अ‍ॅक्शनसह कॉमेडी चित्रपट देखील उत्तम केले आहेत. रोहित शेट्टीची गोलमाल चित्रपटाची सीरीज आजही लोक आवडीने पाहतात. रोहित शेट्टीने आपल्या चित्रपट कारकिर्दीत आतापर्यंत सर्व प्रकारचे चित्रपट केले आहेत. विनोदी चित्रपटांमध्ये गोलमाल, बोल बच्चन आणि सर्कस यांचा समावेश आहे.

रोहित शेट्टी केवळ चित्रपटातच नाही तर टीव्हीवरही अ‍ॅक्शन करत असतो. रोहित शेट्टी गेली अनेक वर्ष 'खतरों के खिलाडी' या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करत आहे. चाहत्यांना आणि खेळाडूंना शो होस्ट करण्याची त्याची पद्धत खूप आवडते.

रोहित शेट्टीचे गाड्यांवरील प्रेम कुणापासून लपलेले नाही. रोहितच्या चित्रपटांमध्ये दिसल्याप्रमाणेच त्याच्याकडे गाड्यांचा संग्रह आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की रोहित शेट्टीच्या 10 मजली शेट्टी टॉवरमध्ये चौथा मजला फक्त कार पार्किंगसाठी आहे. रोहित शेट्टीकडे महिंद्रा स्कॉर्पिओ, रेंग रोव्हर स्पोर्ट, लॅम्बोर्गिनी, फोर्ड मस्टँग GT, मर्सडिज AMG G63 आणि Maserati Gran Turismo Sport सारख्या आलिशान कार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1947 Grocery Price: साखर, मीठ, तेल आणि सोनं...१९४७ मध्ये 'या' गोष्टींची किंमत किती होती?

Maharashtra Live Update: अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस

Krishna Janmashtami 2025: कृष्ण जन्माष्टमीला रात्री करा हे ५ उपाय, घरात नांदेल सुख- शांती

मालेगावात मटण-चिकन शॉप बंद, पालिकेच्या आदेशाचं कडेकोट पालन, VIDEO

Shocking : धक्कादायक! ड्रेनेज लाइनमध्ये उतरलेल्या ३ कामगारांचा मृत्यू, पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT