Deepika Padukone Birthday  Instagram @deepikapadukone
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone Birthday: दीपिका खाते तरी काय? मस्तानीच्या फिटनेसचं सिक्रेट उलगडलं

दीपिका फिटनेस आणि डाएटच्या बाबतीतही अनेकांचे प्रेरणास्रोत आहे.

Pooja Dange

Deepika Padukone Birthday Special: दीपिका पदुकोण ही बॉलिवूडमधील स्टार सेलिब्रिटी आहे. दीपिका तिच्या चित्रपटातील कामासाठी भरपूर प्रेम मिळत आहे, तसेच तिचे कौतुक देखील होत आहे. दीपिका फिटनेस आणि डाएटच्या बाबतीतही अनेकांचे प्रेरणास्रोत आहे. दीपिका तिचा फिटनेस आणि खाण्यापिण्याची शिस्त याबाबतीत खूपच काटेकोर आहे. तिने फिटनेस आणि डायटचे महत्त्व अनेकदा सांगितले आहे.

दीपिकाला बरेचदा फास्ट फूड मोह आवरत नाही. परंतु तिचा डायट आणि नियमित व्यायाम याचे रुटीन ठरलेले आहे. जर तुम्हाला दीपिकाचा आहार काय आहे हे जाणून घेण्यासाठी तर आज आम्ही तिची हे रहस्ये उलघडणार आहोत.

दीपिका दर दोन तासांनी जेवते. तिचा आहाराचा एक साधा नियम आहे, ती म्हणते डोळ्यांनी कधीही खाऊ नका, पोट भरेल इतके खा आणि कधीही जास्त खाऊ नका. एका दिवसात सहा छोटे छोटे मिल्सचा सहभाग असू द्या. जास्त खाऊ नका आणि भूक लागणार नाही तेवढेच खा.

दीपिका तिच्या दिवसाची सुरुवात एक ग्लास कोमट पाण्यात मध आणि लिंबू किंवा मेथीचे दाणे मिसळून करते. यानंतर, तिने प्रोटीनने परिपूर्ण असा नाश्ता करते.

दीपिका दुपारच्या जेवणाच्या आधी, एका वाटीत ताजी फळे आणि काही हिरव्या भाज्या खाते. दीपिकाचे दुपारचे जेवण दररोज वेगळे असते, पण ती पोषणाच्या बाबतीत कधीच तडजोड करत नाही. काही दिवस तिचे दुपारचे जेवण अगदी साधे असते (भाज्या, डाळ आणि चपाती) ज्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनचे योग्य मिश्रण असते. अनेक दिवस त्यात दोन चपात्या, ग्रील्ड फिश आणि विविध प्रकारच्या ताज्या भाज्या असतात. मात्र, दीपिकाला रस्सम आणि भात खायला सुद्धा आवडते.

दीपिकाने कबूल केले आहे की ती तिच्या संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये काही बदाम खाते आणि फिल्टर कॉफी पिते. दीपिका रात्री हलका आहार घेते. यामध्ये ती दोन चपात्या, ताज्या भाज्या आणि हिरवी कोशिंबीर खाते. याशिवाय ती अनेकवेळा डार्क चॉकलेट खाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac signs: आजचा ग्रहयोग काय सांगतो? सोमवार चार राशींना देणार दिलासा

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT