Javed Akhtar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Javed Akhtar: खुद्द शबाना आझमींनी शेअर केला पती जावेद अख्तर यांचा खडतर प्रवास

जावेद अख्तर यांचा प्रवास शबाना आझमी यांनी ट्विटद्वारे मांडला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Javed Akhtar Birthday Special: जावेद अख्तर हे बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. पटकथा लेखक आणि गीतकार म्हणून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चे अढळ स्थान निर्माण केले आहे. सलीम खान आणि त्यांची जोडी बॉलीवूडमधील सुपरहिट जोडींपैकी एक आहे. 17 जानेवारीला जावेद अख्तर यांचा 78 वा वाढदिवस आहे.

त्यांच्या या खास दिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाबद्दल. जावेद अख्तर पहिल्यांदा मुंबईत आले तेव्हा त्यांना चार दिवस उपाशी राहावे लागले. तसेच शबाना आझमीसोबत लग्न करण्यापूर्वीच त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते.

जावेद अख्तर यांचा प्रवास शबाना आझमी यांनी ट्विटद्वारे मांडला आहे. 17 जानेवारी 1945 रोजी ग्वाल्हेरमध्ये जन्मलेल्या जावेद अख्तरचा संघर्ष सोपा नव्हता. ट्विटमध्ये शबाना आझमी यांनी जावेद साहेबांबद्दल बोलताना सांगितले आहे की, वयाच्या १९ व्या वर्षी ते २७ रुपये घेऊन मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर उतरले.

डोळ्यात मोठी स्वप्ने असलेल्या जावेद साहेबांनी आयुष्यात कधीही हार मानली नाही. चार दिवस ते अन्नाशिवाय राहिले होते. मात्र, बॉलीवूडमध्ये संघर्ष केल्यानंतर त्यांचे नशीब खुलले आणि त्यांनी सलीम खानसोबत शोलेसारखा सुपरहिट चित्रपट दिला. 1975 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटासाठी पहिल्यांदाच चित्रपटाच्या लेखकांना करोडोंचे मानधन मिळाले होते.

जावेद अख्तरची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. शबाना आझमीसोबत लग्न करण्यापूर्वी त्यांनी वयाच्या १७ व्या वर्षी फरहान अख्तरची आई हनी इराणीशी लग्न केले. शबाना आझमी या जावेद अख्तर यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. जावेद अख्तर आणि शबाना यांची पहिली भेट झाली जेव्हा जावेद अख्तर शबाना आझमी यांचे वडील कैफी आझमी यांच्या घरी कविता ऐकायला केले होते. जावेद अख्तर यांना शबाना आझमी यांच्या कलाकृतीचे वेड लागले होते.

सततच्या भेटीनंतर दोघे प्रेमात पडले, पण जेव्हा लग्न करायची वेळ आली तेव्हा अभिनेत्रीचे वडील तयार झाले पण शबाना यांच्या आईचा या नात्याला विरोधात होती. याचे प्रमुख कारण म्हणजे जावेद अख्तर आधीच विवाहित होते. मात्र, जावेद अख्तरच्या आयुष्यात शबाना आझमी आल्यावर त्यांचे हनी इराणीसोबत घटस्फोट घेतला.

जावेद अख्तर गीतकार आहेत. जावेद अख्तर नेहमीच त्यांचे मत अतिशय स्पष्टपणे मांडतात. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत येतात. जावेद अख्तरच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर शोले व्यतिरिक्त त्यांनी दुनिया, खेल, डॉन, जंजीर, मिस्टर इंडिया, नमस्ते लंडन यांसारख्या चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना फिल्मफेअर, राष्ट्रीय पुरस्कार तसेच पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, ३ आमदार न आल्यास आयोग मोठा निर्णय घेणार, निकष काय?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : महाराष्ट्रात बहुमत कोणाला ? मविआचा प्लान बी तयार

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT