Pravin Tarde Shared Emotional Story With Parents facebook / Pravin Vitthal Tarde
मनोरंजन बातम्या

Pravin Tarade Post : पन्नास वर्ष चालत जातायेत... आषाढी एकादशीदिवशी प्रवीण तरडेने शेअर केली आई-वडिलांचा भावनिक किस्सा

Pravin Tarade In Pandharpur : प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

Pooja Dange

Pravin Tarde Shared Emotional Story With Parents : अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते प्रवीण तरडे नेहमीच चर्चेत असतो. प्रवीण तरडे यांच्ये चित्रपटाचे विषयांप्रमाणे सोशल मीडियावरील पोस्ट देखील सुंदर असतात.

नुकतीच प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ५० वर्ष वारी करणाऱ्या त्यांच्या आई-वडिलांना त्यांनी विठूरायाची भेट करून दिली आहे. (Latest Entertainment News)

प्रवीण तरडे सोशल मीडियावर पोस्ट

काही महिन्यांपूर्वी आईवडीलांना म्हणालो बोला तुम्हाला कुठे फिरायला जायचंय.. ? तुम्ही म्हणाल तिथं घेउन जातो , म्हणाल त्या देशात.. ते म्हणाले पंढरपूरला घेऊन चल .. मी म्हणालो पंढरपूर ..? का ..? तर ते म्हणाले की पन्नास वर्ष चालत वारी करतोय पांडुरंगाला कधी जवळून नाही पाहीलं , धक्केबुक्के खात ढकलाढकलीतच दिसलाय तो थोडा थोडा.. जरा निरखून पहायचाय..

मग एका एकादशीला शुटींग बिटींग सगळं थांबवून दोघांना घेउन गेलो पंढरपूरला.. विठ्ठलाकडे एकटक बघत बराच वेळ रडतच होते दोघं .. त्या दिवशी त्यांच्या डोळ्यात दिसलं की वारीची ही परंपरा ईतकी वर्ष का टिकून आहे .. पन्नास वर्ष चालत जातायेत तरी ट्रीपला कुठं जायचंय म्हटल्यावर त्यांना पंढरपूरच आठवलं..

वारी चाललेल्या प्रत्येक माऊलीला आषाढीच्या खुप खुप शुभेच्छा

प्रवीण तरडेप्रमाणे अनके मराठी कलाकारांनी आषाढी एकादशीनिमित्त पोस्ट केली आहे. महाराष्ट्राला वारीची परंपरा आहे. आजच्या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पंढरीला विठुरायाच्या दर्शनाला येतात. पण फक्त कळसाच्या पाय पडून निघून जातात. यामुळे त्यांची पुढच्या वर्षी विठुरायाला भेटण्याची ओढ कायम राहते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

SCROLL FOR NEXT