Adipurush Does Not Cross 300 Crore : आदिपुरुष चित्रपटाचा जितका गाजावाजा होता तितकाच आहे चित्रपट अपयशी ठरल्याचे दिसत आहे. निर्मात्यांनी चित्रपटामध्ये नाविन्य दाखविण्याचा केलेला प्रयत्न प्रेक्षकांना आवडलेला दिसत नाहीय. बॉक्स ऑफिसवर देखील चित्रपटाच्या कमाईवज परिणाम झाला आहे. निर्मात्यांना चियत्रपटाकडून जी अपेक्षा होती ती पूर्ण हातानं दिसत नाही.
आदिपुरुष चित्रपटाचे कलेक्शन दिवसेंदिवस कमी होत आहे. एल रिपोर्टनुसार आदिपुरुष चित्रपटाने १.५ करोडचे कलेक्शन केले आहे. तर भारतातील रिलीज करण्यात आलेल्या सर्व भाषांमध्ये चित्रपटाने २८१ करोडची कमाई केली आहे. चित्रपट लवकरच थिएटरमधून काढण्यात येऊ शकतो शकतो असे तज्ञांचे मत आहे. (Latest Entertainment News)
आज सत्यप्रेम की कथा हा चित्रपट देखील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे याचा परिणाम देखील आदिपुरुष चित्रपटाच्या कमाईवर होऊ शकतो.
'आदिपुरुष' सुरुवातीपासून वादामध्ये अडकला होता, अशा वादग्रस्त चित्रपटापेक्षा प्रेक्षक कॉमेडी पाहणे पसंत करू शकतात. दुसरीकडे कार्तिक आणि कियारा यांच्या चित्रपटाच्या ट्रेलरलाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे कार्तिकचा चित्रपट आदिपुरुषच्या कलेक्शनला पूर्णविराम लावू शकतो. आदिपुरुषने 1.50 कोटी कमावले आणि हे चित्रपटाचे आतापर्यंतचे सर्वात कमी कलेक्शन आहे.
बातम्यांनुसार, 500 ते 600 कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तग धरून राहण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी आदिपुरुष चित्रपटाच्या निर्मात्यांना रामायणातील पात्रे "अत्यंत लाजिरवाणी पद्धतीने" चित्रित केल्याबद्दल सुनावले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.