Ruchismita Guru Passed Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ruchismita Guru: आकांक्षा दुबेनंतर पुन्हा फिल्म इंडस्ट्रीला धक्का; नातेवाइकाच्या घरात अभिनेत्रीचा मृतदेह आढळला

उडिया अभिनेत्री-गायिका रुचिस्मिता गुरु हिचे संशयास्पद रित्या मृत्यू झाला आहे.

Chetan Bodke

Ruchismita Guru: भोजपूरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिच्या निधनाच्या बातमीतून सिनेसृष्टी सावरत असतानाच मनोरंजन विश्वातून आणखी एक दुःखद बातमी येत आहे. उडिया अभिनेत्री-गायिका रुचिस्मिता गुरु हिचे संशयास्पद रित्या मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री रुचिस्मिता गुरु तिच्या नातेवाईकाच्या घरी मृतावस्थेत आढळून आली आहे.

रुचिस्मिता तिच्या मामाच्या घरी राहत होती. रुचिस्मिता गुरूने आतापर्यंत अनेक अल्बममध्ये काम केले आहे. अभिनयासोबतच रुचिस्मिता म्यूझिक इंडस्ट्रितही सक्रिय होती. रुचिस्मिताने अनेक मोठ-मोठ्या कार्यक्रमांमध्ये स्टेज परफॉर्म केला होता. रुममध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत रुचिस्मिता आढळून आली होती.

तिच्या आत्महत्येची माहिती मिळताच बलांगीर पोलिस ठाण्यातील पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी रुचिस्मिताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भीमा भोई वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवला आहे. दरम्यान, रुचिस्मिताच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, रुचिस्मितासोबत आलू पराठा बनवण्यावरून वाद झाला होता.

रुचिस्मिताच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या आईने तिला रात्री आठ वाजता आलू पराठा बनवायला सांगितला होता, पण तिने रात्री दहा वाजता बनवणार असल्याचे सांगितले. यावरून आमच्यात भांडण झाले. अभिनेत्रीने यापूर्वीही अनेकवेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. सध्या पोलीस या अभिनेत्रीच्या मृत्यूचे कारण शोधण्यात व्यग्र आहेत. अद्याप पोलिसांच्या हाती रुचिस्मिताचा शवविच्छेदन अहवाल हाती आलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Multibagger Defence Stock: ६ महिन्यात पैसे दुप्पट; बाजारातील हटके स्टॉक, 5 वर्षांत लाखाचे झाले २४,२३,००० रुपये!

Maharashtra Live News Update : स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणाची पुढील सुनावणी 22 सप्टेंबरला

Donald Trump : भारतावर 100% टॅरिफ लावा... मोदींना मित्र म्हणवणाऱ्या ट्रम्पने पाठीत खंजीर खुपसला

Crime: आई गावाकडे गेली, बापाने घेतला संधीचा फायदा; पोटच्या मुलीवर बलात्कार, डोकेदुखीमुळे रुग्णालयात गेली अन्...

Fraud Case : मंत्रालयात लिपिक पदासाठी घेतल्या मुलाखती; आमिष देत गंडा घालणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, दोघे अटकेत

SCROLL FOR NEXT