Not Dharmaveer 3 now Guwahati Files movie  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mangesh Desai: 'धर्मवीर ३' नाही आता 'गुवाहटी फाईल्स' करणार...; निर्माते मंगेश देसाईंच्या वक्तव्याने सोशल मीडियावर रंगली चर्चा

Mangesh Desai: दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित 'धर्मवीर' या चित्रपटाचे २ भाग प्रदर्शित झाले आहेत. आता निर्माते मंगेश देसाई यांनी या चित्रपटाबद्दल मोठी अपडेट दिली आहे.

Shruti Vilas Kadam

Mangesh Desai: दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित असलेला आणि शिवसेनेसाठी महत्त्वाचा मानला गेलेला 'धर्मवीर' या चित्रपटाचे २ भाग प्रदर्शित झाले आहेत. पहिल्या भागात 'धर्मवीर' हा सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही काळातच महाराष्ट्रात मोठे राजकीय बदल झाले आता निर्माते मंगेश देसाई यांनी या चित्रपटाबद्दल मोठी अपडेट दिली आहे.

राजकीय चित्रपटांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरणारी ‘धर्मवीर’ मालिका आता थांबली असे वाटत असेल तर निर्माते मंगेश देसाई यांनी त्यांच्या पुढच्या प्रोजेक्टबद्दल मोठं विधान केलं आहे. एका मुलाखतीत मंगेश देसाई यांनी सांगितल, “आता धर्मवीर ३ नाही, जर मी चित्रपट करणार असलो, तर तो 'गुवाहाटी फाइल्स' असेल आणि तो २०२७-२८ मध्ये येईल,” असे ते म्हणाले.

धर्मवीर’ ही मालिका दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आणि शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असून प्रथम भाग २०२२ मध्ये आलेला आणि सध्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय सत्तांतर झाल्यामुळे चित्रपटाच्या कथेला विशेष लक्ष मिळाले आहे. सध्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत सोडत, काही आमदार आणि खासदारांसह भाजपसोबत युती केली. या राजकीय बंडानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री बनले. २०२४ मध्ये दुसरा भाग 'धर्मवीर २' देखील प्रदर्शित झाला.

मंगेश देसाई यांनी पुढे सांगितले की, “अजून काहीही अंतिम झालं नाही”, म्हणजे प्रकल्प फक्त विचाराधीन अवस्थेत आहे. परंतु गुवाहाटी फाइल्सची नामनिर्देश सुचवते की पुढील चित्रपट राज्यातील राजकीय सत्तांतर व त्या पूर्वपरिस्थितीवर आधारित असू शकतो.

या घोषणेनंतर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी चित्रपटाबद्दल उत्सुकता दाखवली आहे.तर काहींनी टिका केली आहे. एका नेटकऱ्याने टिका करत लिहीले, दिघे साहेबांचा खरा शिवसैनिक आणि भक्त तुम्हाला सांगतो अजिबात करू नका कारण सत्य दाखवण्यायची तुम्ही पात्रता नाही आणि हिंमत त्याहून नाही. तसेच आणखी एकाने लिहीले, या चित्रपटातून आणखी नवा अँगल पहायला मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विरोधकांचे दिवस संपले! राणा जगजितसिंह पाटील यांचा हल्लाबोल|VIDEO

Bihar Election : नितीश कुमारांची बार्गेनिंग पॉवर संपली! भाजप मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकणार का? महत्त्वाचं कारणं

Children Day 2025: या विकेंडला मुलांना घेऊन जा मुंबईतील 5 प्रसिद्ध ठिकाणी, मुलं होतील भरपूर खूश

Bihar Election Results: बिहारमध्ये काँग्रेस भुईसपाट का झाली? ही चार कारणे|VIDEO

Ensure Diabetes Care: डायबिटीज मॅनेजमेंटसाठी प्रगत उपाय! एन्‍शुअर डायबिटीज केअरमुळे होऊ शकतो मोठा फायदा

SCROLL FOR NEXT