Nora Fatehi money laundering case Instagram @norafatehi
मनोरंजन बातम्या

Nora Fatehi: नोरा भोवती ईडी चौकशीचा फेरा; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पु्न्हा ईडीच्या ऑफिसमध्ये दाखल

मनी लाँड्रिंग प्रकरणात नोरा फतेहीची ईडी चौकशी.

Pooja Dange

Nora Fatehi News: नोरा फतेही तिच्या दमदार डान्स आणि ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते. नोरा नेहमीच तिच्या व्हिडिओ आणि फोटोमुळे चर्चेत असते. नोरा फतेही फिफा विश्वचषकमध्ये सहभागी होण्यासाठी कतारमध्ये गेली होती. तिने तिथे स्टेजवर परफॉर्म केले आणि भारताचा जयघोषही केला. त्यावेळी तिने तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. नोराच्या या कृत्यामुळे तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. तर 200 कोटींची फसवणूक आणि सुकेश चंद्रशेखर प्रकरणात चौकशीसाठी आज नोरा फतेही दिल्लीच्या ईडी कार्यालयात गेली आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणात नोरा फतेहीची यापूर्वीही अनेकदा चौकशी झाली आहे. ईडी नोराची पाचव्यांदा चौकशी करत आहे. दिल्ली पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवून आहे. अलीकडेच सुकेशची मॅनेजर पिंकी इराणीलाही दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. (ED)

आज पुन्हा एकदा नोरा फतेहीची चौकशी होणार आहे. पहिल्यांदा दिल्ली पोलिसांनी नोराची सुमारे चार तास आणि दुसऱ्यांदा सात तास चौकशी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशी दरम्यान नोराला सुमारे 50 प्रश्न विचारण्यात आले. (Nora Fatehi)

याआधी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचीही याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जॅकलीनची सुमारे आठ तास चौकशी केली.स्पेशल सीपी क्राईम रवींद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांचा या प्रकरणात सुकेश चंद्रशेखरशी थेट संबंध नव्हता. (Actress)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: घरात येईल सुख-समृद्धि; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल लाभकारी, जाणून घ्या राशीभविष्य

Rajyog 2025: गजकेसरी आणि कलात्मक राजयोगामुळे फळफळणार 'या' राशींचं नशीब; उत्पन्नाचे नवे मार्ग होणार खुले

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

SCROLL FOR NEXT