BigBoss Marathi saamTV
मनोरंजन बातम्या

Big Boss Marathi : "तुझ्यासारख गद्दार कोणीच नाही.." निक्कीने कोणाला लगावला टोला?

Marathi Reality Show : नॉमिनेशन टास्कचा नवा प्रोमो व्हायरल, कोण होणार नॉमिनेट ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

BB Marathi Season 5 Promo : कलर्स मराठी वाहिनीच्या इन्स्टाग्राम पेजवर सहाव्या आठवड्यात पार पडणाऱ्या नॉमिनेशन टास्कचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. याला “घरात ज्याचा खेळ नाही दमदार, तो सरळ बनणार रद्दीचा भार” असं कॅप्शन देण्यात आलं आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा सहावा आठवडा आजपासून सुरू होणार आहे. योगिता, निखिल, पुरुषोत्तम आणि इरिना यांच्या एक्झिटनंतर घरातील उर्वरित सदस्यांमध्ये चांगलीच स्पर्धा निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

घरात आता एकूण १२ स्पर्धक उरले आहेत.‘बिग बॉस’च्या घरात एवढे दिवस अप्रत्यक्ष नॉमिनेशन व्हायचं. टास्क, जोड्या, पॉवर कार्ड किंवा गुहेत गुप्त नॉमिनेशन झाल्याचं आपण पाहिलं आहे. परंतु या सहाव्या आठवड्यात पहिल्यांदाच घरातील सदस्य एकमेकांना थेट समोरासमोर नॉमिनेट करणार आहेत.

टास्क दरम्यान सदस्यांमध्ये बाचाबाची !

‘बिग बॉस’ने घरातील एकूण १२ सदस्यांचे फोटो टेबलवर ठेवले आहेत. याच्या बरोबर बाजूला हिरव्या रंगाची कचरापेटी ठेवण्यात आली आहे. घरात असमाधानकारक कामगिरी करणाऱ्या आणि नको असलेल्या सदस्यांचे फोटो फाडून कचरा पेटीत टाकण्याचा नॉमिनेशन टास्क घरातील सदस्यांना देण्यात आला आहे.

या टास्कदरम्यान सदस्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. अनेकांनी गद्दारी केली, घरात स्वत:चं मत नाही, गेम खेळता येत नाही अशी कारणं देत विरोधी स्पर्धकांना नॉमिनेट केलं आहे. आता या थेट नॉमिनेशन प्रक्रियेत कोण-कोणाला नॉमिनेट करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

घरात यापूर्वी ‘टीम A’ व ‘टीम B’ असे दोन ग्रुप होते. परंतु, निक्कीला भाऊच्या धक्क्यावर तिच्या मित्रमंडळींनी केलेल्या चुगल्या दाखवल्यामुळे ‘A टीम’मध्ये उभी फूट पडली आहे. आता निक्कीची फक्त अरबाजबरोबर मैत्री असून जान्हवी अन् वैभवबरोबर असणारी मैत्री तुटली आहे. त्यामुळे निक्की आता कोणाला नॉमिनेट करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात पार पडणारं हे नॉमिनेशन कार्य पाहून नेटकऱ्यांनी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी कमेंट्समध्ये नेहमीप्रमाणे ‘टीम B’ला सपोर्ट केला आहे. आता ‘टीम B’ या टास्कमध्ये एकत्र खेळणार की त्यांच्याही ग्रुपमध्ये फूट पडणार हे लवकरच स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT