Wonder Women Trailer  Instagram/ @ sonylivindia
मनोरंजन बातम्या

Wonder Women Trailer: 'वंडर वूमन' अमृताने दिली गुडन्युज, ट्रेलरने चाहत्यांचे लक्ष वेधले

अमृताच्या आगामी चित्रपटाचे नाव 'वंडर वुमन' असे आहे. चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला असून चित्रपटाची चर्चा चांगलीच होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Wonder Women Trailer: अभिनेत्री अमृता सुभाषने तिचा पॉझिटीव्ह प्रेग्नेन्सी किटचा फोटो शेअर केला आणि एकच चर्चा रंगली. त्यामुळे ती सोशल मीडियावर बरीच चर्चेत होती. फोटो शेअर केल्यानंतर तिने खुलासा केला की, ही खरच गुड न्युज नसून, एका चित्रपटाची घोषणा आहे. या चित्रपटाचे नाव 'वंडर वुमन' असे आहे. चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला असून चित्रपटाची चर्चा चांगलीच होत आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात गरोदर महिलेच्या प्रसवपूर्व वर्गापासून होते. यामध्ये सुमाना नावाच्या महिलेचा प्रसुतीपूर्वीच्या वर्गात घेऊन जातो, जेथे मातृत्वाच्या शेवटच्या टप्प्यातून जाताना तिचे स्वागत केले जात आहे. सोबतच ट्रेलरमध्ये एक्सपेक्टिंग पॅरेंट्ससाठी सुरक्षित आश्रयस्थानातील एक झलक पाहायला मिळते. चित्रपटाच्या कथेत वेगवेगळ्या पार्श्वभूमी असलेल्या महिलांमधील नाते आणि जीवनाला सामोरे जाण्याची वेगळी पद्धत आणि उत्साह त्यांच्यामध्ये दिसून येत आहे.

हे पात्र सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना आवडणारे आहे, असे दिसत आहे. गर्भधारणा आणि त्या काळातील झालेली नवीन मैत्री एकमेकांना कशी प्रेरणा देते अशी ही कथा त्यांच्या आयुष्यातील एक झलक आहे. “एक बच्चे को पालने के लिए एक गांव की जरूरत होती है” हा डायलॉग प्रत्येकाचे लक्ष वेधुन घेत आहे. या जगात एका बाळाला आणण्यासाठी पालकांनी केलेल्या प्रयत्नांचे हे उत्तम उदाहरण देणारा चित्रपट दिसत आहे.

आरएसव्हिपी (RSVP)आणि फ्लाइंग युनिकॉर्न एंटरटेनमेंट प्रेझेंटेशन, रॉनी स्क्रूवाला सोबतच आशी दुआ सारा निर्मित, अंजली मेनन लिखित आणि दिग्दर्शित चित्रपट १८ नोव्हेंबरपासून सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नादिया मोईडू, नित्या मेनन, पार्वती थिरुवोथू, पद्मप्रिया जानकीरामन, सायोनारा फिलिप, अर्चना पद्मिनी आणि अमृता सुभाष यांच्या मु्ख्य भूमिका दिसत आहेत.

चित्रपटात नोराच्या भूमिकेत नित्या मेनन, मिनीच्या भूमिकेत पार्वती थिरुवोथू, वेन्नीच्या भूमिकेत पद्मप्रिया जानकीरामन, सायाच्या भूमिकेत सायोनारा फिलिप, ग्रेसीच्या भूमिकेत अर्चना पद्मिनी आणि जयाच्या भूमिकेत अमृता सुभाष दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

मोठी बातमी! दिल्लीतील जंतरमंतर आता आंदोलनासाठी बंद; ३ नवीन ठिकाणं जाहीर, भाजप सरकारचा निर्णय

Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी हातात दिसतात 'ही' लक्षणे, वेळीच ओळखलात तर वाचेल जीव

Maharashtra News Live Update: दिल्लीत भाजप आणि काँग्रेसचं आंदोलन

Breaking News : मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या नेत्यासह दोघांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT