Vibhu Raghav SAAM TV
मनोरंजन बातम्या

Vibhu Raghav Death : कॅन्सरशी झुंज अपयशी, प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्याचं निधन

Vibhu Raghav Passed Away : प्रसिद्ध अभिनेता विभु राघव याच निधन झाल आहे. अभिनेता खूप काळापासून कॅन्सरशी झुंज देत होता.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन (Vibhu Raghav Passed Away ) झाले असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे टीव्ही विश्वावर शोककळा पसरली आहे. 'निशा और उसके कजिन्स' या लोकप्रिय मालिकेत काम केलेल्या अभिनेत्याचे निधन झाले आहे. टिव्ही अभिनेता विभु राघव याने सोमवारी अखेरचा श्वास घेतला आहे.

अभिनेत्याचे संपूर्ण नाव वैभव कुमार सिंह राघवे असे आहे. अभिनेत्याचे मुंबईत निधन (Vibhu Raghav Death) झाले आहे. विभु राघव खूप काळापासून कॅन्सरनं ग्रस्त होता. त्याला स्टेज 4 च्या कोलन कॅन्सर होता. 2022मध्ये विभू राघवला कॅन्सर ( Stage 4 Cancer) असल्याचे समजले. तेव्हापासून अभिनेता कॅन्सरशी झुंज देत आहे. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय होता. आपल्या पोस्टमधून कायम चाहत्यांना आपले हेल्थ अपडेट देत होता.

विभु राघववर मुंबईच्या नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. विभु राघवची मैत्रीण आणि लोकप्रिय अभिनेत्री सिंपल कौल काही दिवसांपूर्वी पोस्ट करून विभु राघवच्या उपचारांसाठी आर्थिक मदत मागवली होती. तसेच आता विभु राघवच्या निधनाची बातमी कळताच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

विभू राघव करिअर

विभू राघवला 'निशा और उसके कजिन्स' या मालिकेतून खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्याने 'सावधान इंडिया' या शोमध्ये काम केले. विभू राघव ने आपल्या अभिनयाने चाहत्यांचा मनात घर केले होते. त्यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

SCROLL FOR NEXT