Swarda Thigale : गाडी चालवताना झोप लागली अन्...; 'प्रेमाची गोष्ट' फेम अभिनेत्रीचा मोठा अपघात, पाहा VIDEO

Swarda Thigale Car Accident : 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील मुख्य अभिनेत्री स्वरदा ठिगळेच्या गाडीचा मोठा अपघात झाला आहे. याचा व्हिडीओ शेअर करून तिने ही माहिती चाहत्यांना दिली आहे.
Swarda Thigale Car Accident
Swarda ThigaleSAAM TV
Published On

मराठी मालिका 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) सध्या प्रेक्षकांच भरपूर मनोरंजन करत आहेत. या मालिकेतील कलाकारांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेतील एका अभिनेत्रीसोबत एक मोठी घटना घडली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री स्वरदा ठिगळे (Swarda Thigale) हिच्या गाडीचा अपघात झाला आहे.

स्वरदा ठिगळेने एक व्हिडीओ शेअर करून गाडीचा अपघात झाल्याचे बातमी दिली आहे. या अपघातात स्वरदाला कोणतीही दुखापत झाली नसून गाडीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. शूटिंगवरुन घरी परतत असताना हा अपघात झाल्याची माहिती स्वरदाने दिली. व्हिडीओमध्ये तिने आपल्या गाडीची झालेली वाईट अवस्था दाखवली आहे.

स्वरदा ठिगळेने व्हिडीओमध्ये सांगितलेल्या माहितीनुसार, तिच्या गाडीचा अपघात सकाळी 5.30 च्या सुमारास झाला. तिने सकाळी 7 वाजता काम सुरू केले होते जे दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता संपले. म्हणजे तिचा पॅकअप सकाळी 5 वाजता झाला. ती स्वतः गाडी चालवत असल्यामुळे तिला झोप लागली आणि हा अपघात झाला. अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले. यात गाडीची अख्खी हेडलाइट फुटली. चाक खराब झालं. तसेच गाडीचं दार उघडत नव्हतं. तिच्या कारचा पुढचा भाग संपूर्ण आत गेला होता.

स्वरदा ठिगळेचे या अपघातामुळे मोठे नुकसान झाले आहे. तिला गाडी दुरुस्त करायला खूप खर्च येणार आहे. तसेच तिने व्हिडीओतून सहकलाकारांना चुकूनही असे न करण्याची विनंती केली आहे. ती म्हणाली, "तुमच्या जीवाशी खेळू नका. काम काय होत राहतील जीव महत्त्वाचा आहे." 'प्रेमाची गोष्ट' मालिका सध्या प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करत आहे. या मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

Swarda Thigale Car Accident
Shahrukh Khan : हातावर टॅटू अन् काळा गॉगल; 'किंग'चा पहिला लूक व्हायरल, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com