Nilesh Sable SAAM TV
मनोरंजन बातम्या

Nilesh Sable : बॉलिवूड कलाकार अन् मराठी भाषा, CHYD बाबत निलेश साबळे स्पष्ट म्हणाला...

Nilesh Sable-Chala Hawa Yeu Dya : निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या'मध्ये येणार्‍या बॉलिवूड कलाकारांविषयी त्यांच्या मराठी भाषेविषयी नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

मराठी कॉमेडी शो 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya ) आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'चला हवा येऊ द्या'शो च्या पहिल्या पर्वाचा सूत्रसंचालक निलेश साबळे (Nilesh Sable) सध्या खूपच चर्चेत आहे. तो शोच्या नवीन पर्वात दिसणार नसून त्याच्या जागी मराठमोळा अभिनेता अभिजीत खांडकेकर झळकणार आहे. 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात मराठीसोबत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली आहे.

नुकत्याच एका मिडिया मुलाखतीत निलेश साबळेने बॉलिवूड कलाकारांविषयी सांगितले आहे. निलेश साबळे म्हणाला, "चला हवा येऊ द्या मध्ये सोनम कपूर या पहिल्यांदा बॉलिवूड कलाकार म्हणून आल्या. मग 'फॅन' चित्रपटासाठी शाहरुख खान शोवर आले. आम्ही कधीच कोणाला बोलवलं नाही. त्यांचे प्रोडक्शन हाऊस झी मराठीसोबत संपर्क साधायचे. चला हवा येऊ द्यामध्ये आतापर्यंत जेवढ्या चित्रपटांचे प्रमोशन करण्यात आले आहे त्यातील एकाही चित्रपटाला आम्ही बोलवले नाही. "

पुढे निलेश साबळे बॉलिवूड कलाकारांच्या मराठीबद्दल बोलले की, "बॉलिवूड कलाकार कार्यक्रमात आले की कायम आमचा प्रयत्न असायचा की, त्यांनी मराठीत बोललं पाहिजे. पण सर्वांना पूर्ण वेळ मराठी बोलायला जमायचे नाही. म्हणून आम्ही काही प्रश्न मराठीत विचारायचो. जे त्यांनी आधी सांगितलेले असायचे. कारण 'चला हवा येऊ द्या' हा मराठी कार्यक्रम आहे. पण तरीही त्यांना मराठी नाही जिथे नाही जमायचे तिथे आम्ही हिंदी बोलायचो. मात्र बॉलिवूड कलाकार मराठीत बोलायचा प्रयत्न करायचे. त्यांना मराठी संस्कृतीत आवडते. ते मिसळून जायचे. "

निलेश साबळे त्याच्या फेमस डायलॉग "हसताय ना? हसायलाच पाहिजे" यामुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहचले. निलेश साबळे आणि भाऊ कदम 'चला हवा येऊ द्या'च्या नवीन पर्वात दिसणार नाही आहे. कारण दोघेही एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर विद्यार्थ्यांची भरली शाळा, काय संपूर्ण प्रकरण? वाचा

Maharashtra Live News Update: येवल्यातील हॉटेलमध्ये अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीय महिलेला पोलिसांनी घेतलं ताब्यात

लाडकी बहिण सरकारसाठी ‘गले की हड्डी’, ठाकरे सेनेच्या मुखपत्रातून सरकारला चिमटा, लाडकी ठरली सरकारसाठी दोडकी?

Sleeping Direction: वास्तुशास्त्रानुसार, कोणत्या दिशेने झोपणे चांगले आहे?

Crime: लग्नाला ३ वर्षे होऊनही मूल होत नाही, नवरा बायकोला घेऊन मांत्रिकाकडे गेला; शेतात नेऊन केला बलात्कार

SCROLL FOR NEXT