Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : निक्कीने बिग बॉसचे नियम धाब्यावर बसवले, नेमकं असं काय घडलं?

Shreya Maskar

सध्या 'बिग बॉस मराठी' सर्वत्र गाजत आहे. रोज एक नवीन राडा घरात पाहायला मिळत आहे. घरातील स्पर्धकांमध्ये दिवसेंदिवस वाद आणि स्पर्धा वाढत आहे. या संपूर्ण सिजनमध्ये सर्वत्र निक्कीचा आवाज ऐकू येत आहे. निक्की तांबोळीने (Nikki Tamboli) सर्वांचे लक्ष वेधून घेतल आहे. हा कार्यक्रम प्रत्येक दिवशी नवीन ट्विस्ट घेऊन येत आहे. या आठवड्यात निक्कीच नवून रूप पाहायला मिळणार आहे. निक्कीचे वागणे अनेक प्रेक्षकांना खटकत आहे. आता त्यात भर म्हणजे निक्की या आठवड्यात बिग बॉसचे सर्व नियम मोडताना दिसणार आहे.

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi ) अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये नक्की बिग बॉसच्या घरातील सर्व नियम मोडताना दिसणार आहे. प्रोमोमध्ये निक्की वर्षा ( Varsha Usgaonkar ) ताईंना बोलताना दिसतेय की, "मी कोणतीही ड्यूटी करणार नाही." त्यावर वर्षा ताई निक्कीला म्हणतात,"तू अशी मनमानी करू शकत नाही." तसेच निक्की बिग बॉसच्या घरात झोपेचे नाटक करत असल्याने कोंबडा आरवतो. त्यामुळे आर्या तिच्यावर थंड पाणी ओतणार असल्याचे म्हणते. तसेच या प्रोमोमध्ये अभिजीत नक्कीला समजावताना दिसत आहे. आता यावर बिग बॉस काय निर्णय घेणार यांकडे सर्व प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

कोण होणार नॉमिनेट?

बिग बॉसच्या घरातील सर्वात कठीण आणि मनोरंजक भाग म्हणजे नॉमिनेशन होय. सहाव्या आठवड्यातील नॉमिनेशन जाहीर झाले आहेत. यात निक्की तांबोळी,आर्या जाधव, अरबाज पटेल, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, घन:श्याम दरवडे आणि अभिजीत सावंत यांचा समावेश आहे. आता कोण सेफ होणार आणि कोण अनसेफ होणार? हे पाहणे रंजक ठरणार आहे. निक्कीचा काय असेल गेम प्लान याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. या आधीही निक्की हिंदी बिग बॉसमध्ये खेळताना दिसली होती. बोल्ड, बिनधास्त आणि सुंदर अशी ओळख तिला बिग बॉसने मिळवून दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MVA: मविआत उमेदवारीवरुन वादंग; राऊतांकडून पाचपुतेंना उमेदवारी जाहीर होताच शरद पवार यांनी सुनावलं

Pune Crime : बदलापूरनंतर पुण्यात संतापजनक प्रकार; ४ वर्षीय चिमुकल्यावर तरुणाचा अनैसर्गिक अत्याचार

Maharashtra News Live Updates : पुण्यातील पेठ परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

Nashik Crime : पतीच्या लटकत्या मृतदेहाखाली पत्नीची दुर्गापूजा? 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Maharahstra Politics: रश्मी ठाकरे भावी मुख्यमंत्री; मातोश्रीच्या परिसराबाहेरील बॅनरमुळे चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT