Nick Jonas Viral Video Saam TV
मनोरंजन बातम्या

Nick Jonas Fall Off Stage: लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान स्टेजवरून पडला निक जोनास; प्रियांका चोप्राच्या नवऱ्याचा VIDEO व्हायरल

Nick Jonas' Concert: निक जोनासचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Pooja Dange

Nick Jonas' Fall Off Stage In Live Concert:

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती आणि लोकप्रिय अमेरिकन गायक निक जोनास नेहमीच चर्चेत असतो. दरम्यान, निक जोनासचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये निक त्याचे भाऊ केविन जोनस आणि जो जोनास यांच्यासोबत स्टेजवर परफॉर्म करत आहे. यादरम्यान त्याचा तोल गेला आणि तो स्टेजवरून पडला.

निक जोनास पडल्यानंतर लगेच उभा राहिला आणि त्याने पुन्हा गायला सुरुवात केली. त्याने त्याच्या आत्मविश्वासाने आणि स्वभावाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. मात्र, काही चाहत्यांना त्याच्या तब्येतीचीही काळजी वाटत होती.

त्याच्या या व्हायरल व्हिडीओवर त्याचे चाहते कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले आहे, 'पडल्यानंतर निक ज्या प्रकारे उठला ते अप्रतिम आहे.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'निकला दुखापत झाली नसेल.'

दुसरीकडे, काही लोक कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना सुनावत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, लोकांनी स्टेजची रचना अशा धोकादायक पद्धतीने का केली आहे. या कॉन्सर्टमध्ये निकची पत्नी आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील सहभागी झाली होती.

यापूर्वी निक जोनासच्या कॉन्सर्टचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो लाइव्ह परफॉर्मन्स करत होता. दरम्यान कॉन्सर्टमध्ये उपस्थित असलेल्या एका महिला चाहतीने त्याच्यावर ब्रा फेकली, निकला काही समजले नाही आणि तो काही काळ थांबला. मात्र, यानंतर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता त्याने पुन्हा गायला सुरुवात केली.

तर निकच्या कॉन्सर्टमधील आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याच्या या कॉन्सर्टमध्ये प्रियांका देखील उपस्थित होती. निक गाणे गात असताना प्रियांकाच्या डोळ्यात पाणी आले. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tapalwadi Waterfall : पावसात लांब कशाला? मुंबईतच वसलाय स्वर्गाहून सुंदर टपालवाडी धबधबा

ICC Ranking : आयसीसी रँकिंगमध्ये मोठा उलटफेर; सिकंदर ऑलराउंडर नंबर १, हार्दिक पंड्याचं स्थान धोक्यात

Pandharpur News: पंढरपूरात दीड लाख भाविकांची गर्दी; विठ्ठल-रूक्मिणी पदस्पर्श दर्शनासाठी सहा तासांची प्रतीक्षा|VIDEO

Maharashtra Live News Update: आगामी सिंहस्थ कुंभमेळाच्या तयारीला वेग

OBC Reservation : ठरलं! सरकारच्या 'जीआर'विरोधात कोर्टात जाणार; छगन भुजबळांकडून ओबीसी कार्यकर्त्यांना मोठं आवाहन

SCROLL FOR NEXT