thalapathy vijay and sangeetha Saam tv
मनोरंजन बातम्या

Thalapathy Vijay: थलपथी विजय यांचा संसार पुन्हा रुळावर? पत्नी संगीताने घटस्फोटाची याचिका घेतली मागे

Thalapathy Vijay: थलपथी विजय आणि पत्नी संगीता यांच्या वैवाहिक नात्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. संगीताने घटस्फोटाची याचिका मागे घेतल्याची माहिती समोर आल्याने दोघांमध्ये समेट झाल्याची चर्चा रंगली आहे.

Shruti Vilas Kadam

Thalapathy Vijay: तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि टीव्हीके (TVK) प्रमुख सी. जोसेफ विजय आणि त्यांची पत्नी संगीता सोर्नालिंगम यांच्या वैवाहिक नात्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता नवे वळण मिळाले आहे. संगीता यांनी चेंगल्पट्टू कौटुंबिक न्यायालयात दाखल केलेली घटस्फोटाची याचिका मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दोघांमध्ये समेट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विजय आणि संगीता यांच्या नात्याबाबत गेल्या काही काळापासून माध्यमांमध्ये विविध चर्चा सुरू होत्या. मात्र, घटस्फोटाची याचिका मागे घेतल्याच्या वृत्तामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल २७ वर्षांच्या वैवाहिक नात्यानंतर दोघांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

याचिकेत करण्यात आले होते गंभीर आरोप

फेब्रुवारीमध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेत संगीता यांनी विजय यांच्यावर गंभीर आरोप केल्याचे सांगण्यात आले होते. विजय यांचे एका अभिनेत्रीशी कथित अनैतिक संबंध असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. हे संबंध २०२१ मध्ये समोर आल्याचेही त्यात नमूद करण्यात आल्याचे सांगितले जाते. विजय यांनी हे संबंध संपवण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते सुरूच राहिले, असा दावा याचिकेत करण्यात आला होता. तसेच विजय यांनी संगीता यांना त्यांच्या सामाजिक आणि व्यावसायिक आयुष्यातून दूर केल्याचा आरोपही करण्यात आला होता.

सोशल मीडिया पोस्टमुळे मानसिक त्रास?

याचिकेत संबंधित अभिनेत्री विजय यांच्यासोबतच्या प्रवासांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असल्याचा दावाही करण्यात आला होता. या पोस्ट्समुळे आपल्यासह आपल्या दोन मुलांना सामाजिक अपमानाला सामोरे जावे लागल्याचे संगीता यांनी म्हटले. याशिवाय आर्थिक निर्बंध, सुविधांमध्ये कपात आणि आपल्या हालचालींवर मर्यादा आणल्याचे आरोपही याचिकेत करण्यात आल्याची माहिती आहे. २०२४ पासून सुरू असलेल्या सोशल मीडिया चर्चांमुळे मानसिक त्रास झाल्याचा दावाही करण्यात आला होता.

कोण आहेत संगीता सोर्नालिंगम?

संगीता सोर्नालिंगम या विजय यांच्या पत्नी असून त्या प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत करतात. श्रीलंकन तमिळ पार्श्वभूमी असलेल्या संगीता यांचे पालनपोषण यूकेमध्ये झाले. २५ ऑगस्ट १९९९ रोजी विजय आणि संगीता विवाहबंधनात अडकले. त्यांना जेसन संजय आणि दिव्या साशा अशी दोन मुले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आपल्या मागण्यासाठी महिलांनी सिंचन भवन येथील संबंधित अधिकाऱ्याच्या टेबलवर फोडल्या बांगड्या

Sindhudurg Fort : सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यावरील छुपा किल्ला; इतिहासात दडली आहेत रहस्ये, अनुभवाल नजरेत भरणारे सौंदर्य

Stye Eye Care : डोळ्याला रांजणवाडी येण्याआधी दिसतात 'ही' ६ लक्षणे, वेळीच जाणून घ्या नाहीतर...

Good News: ST प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, घरबसल्या NCMC कार्ड रिचार्ज करता येणार; कसं ते वाचा...

Shiv Sena Symbol Hearing: दोन्ही शिवसेनेने बाळासाहेबांच्या नव्हे, तर स्वतःच्या बळावर लढावे; सुप्रीम कोर्ट

SCROLL FOR NEXT