MasterChef India  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Masterchef India: तुमच्यात देखील पाककलेचे कौशल्य आहे? तर, 'मास्टर शेफ' च्या नव्या सिझनमध्ये आजच ऑडिशन द्या !

भारतातील सर्वात लाडका मानला जाणारा रिअॅलिटी कुकिंग शो म्हणजे 'मास्टरशेफ इंडिया' हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: स्वयंपाक बनवायला कोणाला आवडत नाही. प्रत्येकजण आपआपल्या चवीप्रमाणे चमचमीत पदार्थ बनवायचा प्रयत्न करतो. लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकजण स्वयंपाक बनवायला ही शिकले. जर आपल्या चवीचे पदार्थ आपण एका रिअॅलिटी शो मध्ये जाऊन बनवायला लागलो तर? भारतातील सर्वात लाडका मानला जाणारा रिअॅलिटी कुकिंग शो म्हणजे 'मास्टरशेफ इंडिया' हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

यावेळी हा रिअॅलिटी शो ओटीटी म्हणजे सोनी लिव्ह सोबतच सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन वर पाहू शकणार आहेत. कार्यक्रमातील नव्या आणि आपल्या पाककृतींनी उत्साही स्पर्धक प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. लवकरच नवा मास्टरशेफ शोधण्यासाठी ऑडिशन सुरु होत आहे, ऑडिशनची सुरुवात कोलकात्यापासून होणार असून नंतर अनुक्रमे मुंबई, हैद्राबाद आणि दिल्ली येथे उर्वरित फेऱ्या होणार आहेत.

या मास्टरशेफमधून भारताला नव्या मास्टरशेफचा चेहरा मिळणार आहे. स्पर्धकांना जर चमचमीत पदार्थ बनवायला आवडत असतील, खवय्यांना आपल्या हातचे पदार्थ द्यायला खूप आवडत असेल, आपले आयुष्य पाककौशल्याच्या अवतीभोवती फिरत असेल तर तुम्हीही या रिअॅलिटी शो चा भाग होऊ शकता. आपल्याला ही मास्टर शेफच्या नव्या सीझनमध्ये सहभागी व्हायचे असेल तर, २४सप्टेंबर, ८ आणि १५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ऑडिशन्समध्ये भाग घ्यायचा आहे.

'मास्टरशेफ'च्या ऑडिशन पुढीलप्रमणे दिलेल्या ठिकाणी होणार आहेत.

1. कोलकात्यामधील ऑडिशन्स 24 सप्टेंबर रोजी, इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, पी-16, तारातला रोड, सीपीटी कॉलनी, अलीपोर, कोलकाता, पश्चिम बंगाल 700088 येथे होणार आहेत.

2. दिल्‍ली ऑडिशन्‍स 1 ऑक्‍टोबर रोजी हॅप्‍पी मॉडेल स्‍कूल, बी2, जनकपुरी, नवी दिल्‍ली 110058 येथे घेण्‍यात येतील.

3. मुंबईतील ऑडिशन्स 15 ऑक्टोबर रोजी रायन इंटरनॅशनल स्कूल, वास्तू पार्क, ऑफ लिंकिंग रोड, मालाड, एव्हरशाईन नगर, मालाड पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र 400064 येथे आयोजित करण्यात आले आहेत.

4. हैदराबादमधील ऑडिशन्स 6 ऑक्टोबर रोजी सेंट. अॅन्स कॉलेज फॉर विमेन, ए/75, सेंट अॅन्स रोड, संतोष नगर, मेहदीपटनम, हैद्राबाद, तेलंगणा 500028 येथे पार पडेल.

विविध शहरांतील ऑडिशन्स पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष शोमध्ये देशभरातील शेफ्स स्पर्धेसाठी एकमेकांसमोर उभे दिसतील. हे मास्टरशेफ खवय्यांना आपल्या हाताने स्वादिष्ट, चमचमीत पदार्थ खायला घालण्यासाठी सज्ज झाले आहे. आता परीक्षक मंडळी देखील उत्साहात येत, मनातील उर्मीला साद देत, प्रतिभावशाली पाककुशल जाणकार मंडळींना मास्टरशेफ इंडियाच्या या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत. जर तुम्हालाही या नव्या सीझनमध्ये सहभागी व्हायचे असेल तर, या स्पर्धेसाठी आपली नावनोंदणी करायला आणि ऑडिशन्स द्यायला विसरू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT