Man Kasturi Re Trailer  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Man Kasturi Re Trailer: नेमके त्या रात्री काय झाले? ट्विस्ट निर्माण करणाऱ्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का?

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये भरपूर सस्पेन्स आणि ट्विस्ट पाहायला मिळत असून एकमेकांसाठीचा द्वेष, सूड भावनाही यात दिसत आहे. त्यांचे प्रेम एवढ्या टोकाला का पोहोचते, हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: एका रॅाक कॅान्सर्टमध्ये ‘नाद’ गाण्याचे धुमधडाक्यात प्रदर्शन करण्यात आले(Marathi Entertainment News). सोशल मीडियावर या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून यावेळी अभिनय बेर्डे आणि तेजस्वी प्रकाशची स्कुटीवरून धमाकेदार एन्ट्री झाली. यावेळी संपूर्ण चित्रपटाची टीम उपस्थित होती. (Marathi Actors) (Marathi Actress)

सर्वसामान्य घरातून आलेल्या प्रत्येक मुलाचे काही गगनचुंबी स्वप्न असतात. स्वतःचे घर, एक चांगली नोकरी, आईच्या चेहऱ्यावरील हास्य. असंच स्वप्न घेऊन जगणाऱ्या सिद्धांतचे त्याच्या आईवर जीवापाड प्रेम आहे. कॉलेजमध्ये शिक्षण घेत, घरखर्चासाठी नोकरी करत सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या सिद्धांतच्या आयुष्यात श्रुती येते आणि त्याचे पूर्ण आयुष्यच बदलते. श्रुती आणि सिद्धांत एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. मग असे काय होते की, ज्यामुळे त्या दोघांच्या प्रेमाला नजर लागते. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये भरपूर सस्पेन्स आणि ट्विस्ट पाहायला मिळत असून एकमेकांसाठीचा द्वेष, सूड भावनाही यात दिसत आहे. त्यांचे प्रेम एवढ्या टोकाला का पोहोचते, हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

संकेत माने दिग्दर्शित 'मन कस्तुरी रे' येत्या ४ नोव्हेंबर रोजी सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नितीन केणी यांच्या नेतृत्वाखाली, मुंबई मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत, व्यंकट अत्तिली, मृत्यूंजय किचंबरे यांच्या इमेन्स डायमेंशन एन्टरटेनमेंट ॲण्ड आर्ट्स निर्मित या चित्रपटाचे सहनिर्माते ड्रॅगन वॅाटर फिल्म्सचे निशीता केणी आणि करण कोंडे आहेत. वितरणाचे काम युएफओ सिने मीडिया नेटवर्क करणार असून संगीत प्रदर्शनाची धुरा टिप्सने सांभाळली आहे. नितीन केणी यांनी यापूर्वी ‘सैराट’सह अनेक सुपरहिट चित्रपटांच्या निर्मितीची धुरा सांभाळली असून ‘मन कस्तुरी रे’चे प्रस्तुतकर्ता आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jupiter Saturn Yuti effects: 12 वर्षांनी गुरु-शनि बनवणार दुर्लभ संयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार, पैसाही येणार हाती

Jalna : बंदुकीचा धाक दाखवून व्यापाऱ्याचे अपहरण; ५० लाख रुपयांची खंडणी मागणारे दोघे अटकेत, जालना जिल्ह्यात खळबळ

Mughal harem: मुघल हरममध्ये रात्रीच्या वेळेस दासींना कोणती कामं करावी लागत?

Kitchen Hacks: पावसाळ्यात कढीपत्ता आणि कोथिंबीर ताजेतवाने कसे ठेवाल? जाणून घ्या खास टिप्स

Maharashtra Live News Update : आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक

SCROLL FOR NEXT