Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : नेटकरी 'बिग बॉस मराठी'च्या निर्मात्यांवर संतापले; केला गंभीर आरोप, म्हणाले सूरज...

Suraj Chavan : 'बिग बॉस मराठी 5' शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपले आहे. अशात नेटकऱ्यांनी 'बिग बॉस मराठी'च्या निर्मात्यांवर आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Shreya Maskar

बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) खेळ रंगत आहे. हा गेम शेवटच्या टप्प्यात आला आहे.बिग बॉसचे सर्व सीझन 100 दिवसांचे होते. मात्र 'बिग बॉस मराठी 5' सीझन हा 70 दिवसांत संपवण्याचा निर्णय बिग बॉसच्या निर्मात्यांनी घेतला. यामुळे चाहते खूप नाराज झाले आहेत. कारण बिग बॉसचे 5 पर्व खूप गाजत आहे. तसेच बिग बॉसवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. नेटकऱ्यांमध्ये अशी चर्चा रंगत आहे की, बिग बॉसला अभिजीत किंवा अंकिताला विजेता घोषित करायचे आहे. त्यामुळे ते सूरज चव्हाणकडे दुर्लक्ष करत आहेत.

नेटकरी म्हणतात की, सूरजला प्रत्येक वेळी नॉमिनेशनला सामोरे जावे लागले. तरीही महाराष्ट्राने असंख्य मते देऊन त्याला वाचवले. सूरज चव्हाण (Suraj Chavan) बिग बॉसचा विजेता व्हावा असे महाराष्ट्राला वाटत आहे. तसेच सूरजचा बिग बॉसचा प्रवास दाखवताना देखील यात खूप गोष्टी अपूर्ण होत्या असे देखील नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच आता त्याला शोमध्ये जास्त दाखवत नसल्याचे देखील सर्वत्र बोले जात आहे.

सूरजचा मोठा चाहता वर्ग आहे. जो त्याला नेहमी वाचवतो. घरातील प्रामाणिक सदस्य म्हणून सूरजची ओळख आहे. बिग बॉसच्या घरात पॅडीदादा आणि सूरजमध्ये छान मैत्री झालेली पाहायला मिळाली. पॅडीदादा गेल्यानंतर सूरजला खूप वाईट वाटले. कोण उचलणार बिग बॉस मराठीची ट्रॉफी याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. अनेकांना सूरजच जिंकावा असे वाटत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai To Gondia Travel: मुंबईवरून गोंदियाला प्रवास करणार आहात? जाणून घ्या रेल्वे, बस आणि विमानाचे सर्व पर्याय

IND vs AUS: काय ही फालतूगिरी? वारंवार पावसाचा व्यत्यय, फक्त ३२-३२ ओव्हर्सचा सामना, काय आहे नियम?

Maharashtra Live News Update : पुढचा कार्यक्रम ३ वाजता समजेल- राज ठाकरे

Musician Passes Away: जगप्रसिद्ध संगीतकाराचे निधन; वयाच्या ४८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, संगीतविश्वात शोककळा

Jui Gadkari Photos: "तुला पाहता आजही, हासते या मनी चांदणे" जुई गडकरीचं फोटोशूट चर्चेत

SCROLL FOR NEXT