Netflix OTT Upcoming Release Saam Tv
मनोरंजन बातम्या

Netflix OTT Upcoming Release: २०२४ मध्ये प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा धमका, 'हिरामंडी' ते 'खाकी २' पर्यंत हे चित्रपट-वेबसीरिज होणार रिलीज

Netflix OTT Release In 2024: नेटफ्लिक्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर त्यांच्या आगामी चित्रपटांबद्दलची माहिती दिली आहे.

Chetan Bodke

Netflix OTT Upcoming Release In 2024

प्रेक्षकांचा ओटीटी वरील कल सर्वाधिक वाढला आहे. कोव्हिडनंतर प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याची उत्सुकता थिएटरमध्ये नाही तर, ओटीटीवर सर्वाधिक आहे. भारतात ओटीटी प्लॅटफॉर्मची काही कमी नाही. Amazon Prime Video, Netflix, Zee 5, Disney Plus Hotstar सह असे अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत. नुकतंच नेटफ्लिक्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर त्यांच्या आगामी चित्रपटांबद्दलची माहिती दिली आहे. यात अनेक मोस्ट अवेटेड आणि बिग बजेट चित्रपट व वेबसीरीज आहेत. (Bollywood)

नुकतंच नेटफ्लिक्स इंडियाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तब्बल १९ एकूण चित्रपट आणि वेबसीरिज आहेत. यापैकी काही चित्रपट, वेब सीरिजच्या रिलीज डेट आधीच निर्मात्यांनी जाहीर केलेल्या आहेत. यामध्ये, ‘खाकी: द बंगाल चॅप्टर’, ‘कोटा फॅक्टरी ३’, ‘काली काली आंखे सीझन २’, ‘डब्बा कार्टेल’ आणि ‘फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलिवूड वाइव्हज’ यांसारख्या वेबसीरिजचा समावेश आहे. आणखी दमदार आशय असलेले चित्रपट आणि वेबसीरीजही यादीमध्ये आहे. (OTT)

लवकरच प्रेक्षकांना ‘द कपिल शर्मा शो’ ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. या शोचा ही यामध्ये प्रेक्षकांना टिझर पाहायला मिळत आहे. सध्या प्रेक्षक वेबशो, वेब फिल्म्स आणि वेब सीरिज पाहण्यासाठी कमालीचे उत्सुक असून लवकरात लवकर वेब फिल्म्स आणि वेब सीरिज रिलीज करावे अशी मागणी करीत आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

'ही शान कुणाची, लालबागच्या राजाची!' मंडपाबाहेर येताच देशभक्तीवर गाणं वाजलं, भाविकांच्या अंगावर काटा अन् डोळ्यात अश्रू

Akshay Kumar: अक्षय कुमारचा दिलदारपणा; पूरग्रस्तांना केली ५ कोटींची मदत, म्हणाला 'ही माझी...

SCROLL FOR NEXT