Neha Bhasin: बिग बॉस ओटीटी आणि बिग बॉस 15 मध्ये आपल्या हटक्या अंदाजाने प्रभावित करणारी नेहा भसीन सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. नेहा भसीन नेहमीच व्हिडीओमध्ये तिच्या अभिनयापेक्षा तिच्या बोल्ड लूकनेच सर्वत्र चर्चा असायची. सोशल मीडियावर सक्रिय असलेली नेहा भसीन तिच्या चाहत्यांसाठी तिचे सिझलिंग हॉट फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच नेहा भसीनचा एक जुना व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओतील नेहाचा लूक पाहून नेटीझन्स तिला उर्फी जावेद 2.0 म्हणत आहेत.
बॉलिवूड गायिका नेहा भसीनचा नुकताच एक बोल्ड व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये नेहा भसीन इंस्टाग्रामवर बोल्ड ब्लॅक ड्रेसमध्ये दिसत असून तिच्या किलर स्टाइलने सर्वांचेच लक्ष विचलीत केले आहे. नेहा भसीना पिन-स्टिच केलेल्या ड्रेसमध्ये खूपच हॉट अवतारात दिसत आहे. पिन-स्टिच केलेल्या ड्रेसमध्ये चाहत्यांनी तिला पाहताच सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
नेहा भसीनने काळ्या रंगाच्या ड्रेसमधील लूकने नेटकऱ्यांचे ऐन गुलाबी थंडीत चांगलेच तापमान वाढवले आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी नेहाला उर्फी जावेद 2.0 म्हणत आहेत, तर काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की नेहाने उर्फीलाही मागे सोडले आहे. नेहा भसीनने आता पर्यंत तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओंमुळे सोशल मीडियावर वर्चस्व कायम ठेवले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.