Neetu Kapoor, Ranbir Kapoor  Saam TV
मनोरंजन बातम्या

Kapoor Ganapati Visarjan: सून कुठे आहे? रणबीर आणि नीतू कपूरने केलं बाप्पाचं विसर्जन; मात्र आलिया झाली ट्रोल

Neetu Kapoor And Ranbir Kapoor:

Pooja Dange

Alia Bhatt Get Trolled For Not Attending Family Function:

देशभरात गणेशोत्सवाची धूम आहे. यावर्षी अनेक सेलिब्रिटींच्या घरी गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली होती. पाच दिवसांनी अनेकांनी बाप्पाला निरोप दिला आहे. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

कपूर कुटुंबियांच्या आरके स्टुडिओमध्ये गणपतीचा जल्लोष असायचा. अनेक सेलिब्रिटी आरके स्टुडिओमध्ये कपूर कुटुंबियांच्या बाप्पाच्या दर्शनासाठी हजेरी लावायचे. कपूर कुटुंबियांची गणपतीची परंपरा रणबीर कपूरने पुढेही सुरू ठेवली आहे. रणबीर कपूर आणि नीतू कपूर यांनी काल मोठ्या उत्सहात त्यांच्या गणपतीचे विसर्जन केले.

रणबीर कपूर आणि नीतू कपूर यांनी अगदी मनोभावे पूजा करत गणपती बाप्पाचे विसर्जन केले. रणबीर बाप्पाची मूर्ती घेऊन अनवाणी आला होता. त्याने रेड टी-शर्ट आणि टोक्यावर त्याची नेहमीची कॅप घातली होती. तर नीतू कपूरने हिरव्या रंगाचा ड्रेस घातला होता. तर दोघंही संपूर्ण वेळ गणपतीचा जयघोष करत होते.

कपूर कुटुंबाच्या या विसर्जनाला मात्र त्यांची सून आलिया भट कुठेही दिसली नाही. यामुळे आलिया कुठे आहे असा प्रश्न नेटकरी विचारात आहेत. अंबानींच्या गणपतीच्या दर्शनाला आलिया तिचा फ्रेंड अयान मुखर्जीसह गेली होती. रणबीर मात्र तिथे गेला नव्हता. तर आलिया, नीतू कपूर यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला देखील नव्हती.

आलिया फॅमिली फंक्शनला दिसत नसल्याने नेटकरी अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. तसेच नेटकरी आलिया यावरून ट्रोल देखील करत आहेत.

दरम्यान आलिया फॅशन शोमध्ये सहभागी होण्यासाठी इटली येथील मिलान येथे गेली होती. तर काल ती एअरपोर्ट देखील दिसली असे असूनही ती विसर्जनाला का आली नाही, अशी विचारणा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: चहावाल्याच्या घरी सापडलं घबाड; १ कोटींची रक्कम अन् सोने,चांदी; दोन भावांचा कांड पाहून अधिकारीही चक्रावले

Bihar Election : ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा

Maharashtra Live News Update : नाशिकमध्ये पावसाचा धुमाकूळ, शेतकरी धास्तावले

Wednesday Horoscope: कौटुंबिक जीवनामध्ये सुसंवाद साधाल, पाडव्याचा सण कसा जाणार? वाचा राशीभविष्य...

Bharli Bhendi Recipe : कुरकुरीत अन् झणझणीत भरली भेंडी, चव अशी की खातच राहाल

SCROLL FOR NEXT