Bharti Singh Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bharti Singh And Harsh Drugs Case: भारती आणि हर्षच्या अडचणीत आणखी वाढ, एनसीबीने न्यायालयात सादर केले आरोपपत्र

मुंबई एनसीबीने भारती सिंग आणि हर्ष यांच्याविरोधात न्यायालयात 200 पानी आरोपपत्र दाखल केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bharti Singh And Harsh Drugs Case: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीशी संबंधित अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींची नावं ड्रग्जप्रकरणात समोर आली होती. यामध्ये कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया यांचाही सहभाग होता. ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी भारती आणि पती हर्ष यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई एनसीबीने भारती सिंग आणि हर्ष यांच्याविरोधात न्यायालयात 200 पानी आरोपपत्र दाखल केले आहे.

कॉमेडियन भारती आणि तिच्या पतीला ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने घरातून अटक केली होती. सध्या दोघेही जामिनावर बाहेर आले आहेत. 2020 मध्ये एनसीबीने भारती सिंगच्या प्रोडक्शन हाऊसच्या कार्यालयावर आणि घरावर छापा टाकला होता ज्यामध्ये 86.5 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता.

एनसीबीच्या आरोपपत्रानंतर भारती आणि हर्षविरुद्ध न्यायालयात खटला सुरू होणार आहे. भारतीच्या घरातून गांजा सापडल्यानंतर भारती आणि तिच्या पतीला अटक करण्यात आली होती. मात्र, काही दिवसांनी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने प्रत्येकी 15 हजार रुपयांची सुरक्षा ठेव जमा केल्यानंतर दोघांनाही जामीन मंजूर केला.

2020 वर्ष सर्वांसाठीच कठीण होतं. सुशांत सिंगच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये तर मोठे वादंग निर्माण झाले होते. त्या प्रकरणात अनेक बॉलिवूडमधील कलाकारांमागे चौकशीचा फेरा मागे लागला. त्या प्रकरणामुळे पहिल्यांदाच बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण उघडकीस आले.

भारती आणि हर्षशिवाय रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांनाही ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. तसंच या प्रकरणात अभिनेत्री श्रद्धा कपूर ते सारा अली खानपर्यंत अनेकांच्या नावांची यादी समोर आली.

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंगला कोणत्याही ओळखीची गरज नाही. भारती तिच्या कॉमिक टायमिंगमुळे घरोघरी प्रसिद्ध आहे. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या शोमधून भारतीने छोट्या पडद्यावरचा तिचा विनोदी प्रवास सुरू केला.

भारतीची 'लल्ली' मधील व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडली होती, या व्यक्तिरेखेमुळेच तिला ओळख मिळाली. भारती सिंगने 'कॉमेडी सर्कस 3 का तडका' आणि 'कॉमेडी का महासंग्राम' सारख्या शोद्वारे लोकांना खूप हसवले आहे.

भारती सिंग केवळ स्टँड-अप कॉमेडियनच नाही तर अँकर देखील आहे. भारतीने अनेक रिअॅलिटी शो आणि अवॉर्ड फंक्शन्समध्ये अँकरिंग केले आहे. भारती सिंगचे 'लल्ली'चे पात्र असो किंवा 'बुवा'चे पात्र असो, ती आपल्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वांच्या मनात जीव आणते. भारतीच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरूनही लावता येतो की ती सर्वाधिक मानधन घेणारी महिला विनोदी कलाकार आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! 20 वर्षानंतरच घेता येणार VRS; सरकारकडून नवी गाइडलाइन जारी

Parth Pawar Pune Land Scam Case: पुण्यातील 1800 कोटींची जमीन 300 कोटीत, पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप

Face Care: नॅचरल ग्लोईंग स्किनसाठी लावा 2 मिनटात तयार होणारा 'हा' हॉममेड फेस मास्क

Women’s World Cup 2025: महिला वर्ल्ड कप विजेत्या टीमला टाटा मोटर्सकडून मोठ्ठं गिफ्ट; प्रत्येक खेळाडूला मिळणार नवी Tata Sierra SUV

Maharashtra Live News Update: फलटण प्रकरणात तिसरा मोठा दणका, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली

SCROLL FOR NEXT