Urfi Javed: उर्फीने बोल्ड व्हिडिओ शेअर करत अभिनेत्याला दिले जोरदार प्रत्युत्तर; म्हणाली 'ट्विटर, इंस्टाग्राम विकत घेण्याइतकं...'

उर्फीने पुन्हा एकदा तिचा अतिशय बोल्ड व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
Urfi Javed
Urfi JavedInstagram @urf7i
Published On

Urfi Javed News: बिग बॉस ओटीटीच्या भागातील अभिनेत्री उर्फी जावेदने तिच्या व्हिडिओला 'खराब' म्हणणारा अभिनेता सुधांशू पांडेवर निशाणा साधला आहे. उर्फीने पुन्हा एकदा तिचा अतिशय बोल्ड व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ तिने त्याच शैलीत शूट केला आहे, ज्यावर सुधांशूने टीका केली होती. या व्हिडिओमध्ये उर्फीने फक्त एका बाजूला स्पार्कली स्लीव्हज असलेला टॉप घातला आहे. या व्हिडिओला तिने कॅप्शनही दिले आहे. उर्फीने या कॅप्शनमध्ये कोणाचेही नाव लिहिले नसले तरी तिचे कॅप्शन वाचून हा मेसेज सुधांशूसाठीच आहे हे कोणाच्याही लक्षात येऊ शकते.

Urfi Javed
Bigg Boss Marathi 4: 'कोणाची लायकी काढतोस तू'; बिग बॉस मांजरेकर किरण मानेवर का संतापले?

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये उर्फी जावेदने लिहिले आहे की, जोपर्यंत तुम्ही ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक विकत घेण्याइतके श्रीमंत होत नाही, तोपर्यंत तुम्हाला माझे हे वाईट प्रोफाइल सहन करावे लागेल. तुमच्यासाठी हा धडा आहे – तुम्ही जगावर नियंत्रण ठेवू शकत नाही. तुम्ही खूप लहान आहात (त्यापैकी काही त्या सरासरीपेक्षाही कमी आहेत) ज्यांना वाटते की, एखादी मुलगी काय कपडे घालते यावर मत व्यक्त करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे.” (Social Media)

अनुपमा मालिकेतील अभिनेता सुधांशू पांडेने अलीकडेच उर्फी जावेदच्या दिवाळी व्हिडिओवर टीका केली होती. दिवाळी व्हिडिओमध्ये उर्फीने टॉपलेस होऊन चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. (Actor)

हा व्हिडिओ पाहून सुधांशू पांडे संतापले आणि त्यांनी आपला राग सोशल मीडियावर व्यक्त केला होता. सुधांशू पांडेने इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट उर्फीवर टीका केली होती. त्याचे म्हणणे होते की, जरी तो उर्फी जावेदला सोशल मीडियावर फॉलो करत नसला तरी तिचा व्हिडिओ सुधांशूच्या इन्स्टाफीडमध्ये आला होता आणि त्याला तो व्हिडिओ खराब आणि आक्षेपार्ह वाटला. सुधांशू पांडेने लिहिले की, "मी या व्यक्तीला फॉलो करत नाही, पण तरीही मला दररोज अशी भयानक दृश्ये पाहावी लागतात, न्यूज हँडल्सना याबद्दल धन्यवाद. हे पाहून मला राग येत आहे. तुम्ही लोक दिवाळीसारख्या शुभ सणाची अशी थट्टा कशी करू शकता… देवासाठी हा दिवस लक्ष्मीपूजनाचा आहे.” (Viral)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com