Nawazuddin Siddiqui Instagram
मनोरंजन बातम्या

Nawazuddin Siddiqui: नवाजच्या पत्नीनं नवाजवर केले अनेक गंभीर आरोप, पत्नीसह मुलीची रडून रडून झालीय 'अशी' अवस्था

नवाजच्या पत्नीने व्हिडीओ शेअर करत पतीने आपल्या आणि मुलांना रात्री मुलांसह घराबाहेर काढल्याचा आरोप केला.

Chetan Bodke

Nawazuddin Siddiqui: बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनात 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' म्हणून छाप पाडणारा नवाझुद्दीन सिद्दीकी सध्या खासगी आयुष्यात बराच चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याचे आणि पत्नीतील वाद बरेच चर्चेत आले आहे. नुकतच काल त्याच्या आजारी असलेल्या आईला भेटायला गेलेल्या नवाजला त्याच्या भावाने थेट बाहेरचाच रस्ता दाखवला आहे. नुकतेच नवाजच्या पत्नीने दोन व्हिडीओ शेअर करत पतीने आपल्याला रात्री मुलांसह घराबाहेर काढल्याचा आरोप केला.

आलियाने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दोन व्हिडिओ शेअर केले आहे. त्यात तिने नवाजवर अनेक आरोप केले आहे. आलियाने शेअर केलेल्या व्हिडीओला कॅप्शन दिले की, "नवाजने साधं त्याच्या मुलांना ही सोडलं नाही, हे आहे त्याचं सत्य. तब्बल ४० दिवस घरात राहिल्यानंतर मी घराबाहेर पडले. कारण मला वर्सोवा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी बोलवले होते. पण जेव्हा मी आणि माझे मुलं घरी परतले, तेव्हा मला माझ्या मुलांसह आत येऊ देऊ नये म्हणून नवाजने गार्ड्स नेमले होते. त्याने माझ्यासोबत माझ्या मुलांनाही अगदी क्रूरपणे रस्त्यावर सोडून दिलं." असं म्हणत तिने आपल्या पतीवर आरोप केले.

आलियाने नवाजवर इतक्यावर आरोप करणं सोडले नाही. ती कॅप्शनमध्ये पुढे म्हणते, " त्या मुलींना विश्वास बसत नाही की, आपले वडील आपल्या सोबत असं करत असतील. वडिलांनी घराबाहेर काढल्यामुळे दोन्हीही मुली रस्त्यावर रडत होत्या. नशीब माझ्या एका नातेवाईकाने मला आणि माझ्या मुलींना घरात नेलं. त्याची मानसिकता मला आणि माझ्या मुलांना घराबाहेर फेकण्याची क्रूर योजना होती. यावरून नवाजुद्दीन सिद्दीकी हा माणूस किती खालच्या दर्जाचा माणूस आहे, हे सर्वांना स्पष्ट दिसून आलं असेल. मी व्हिडीओ शेअर करत आहे, ज्यात तुम्हाला या माणसाचं सत्य दिसेल.”

आलियाने नवाजुद्दीनवर खोटी माहिती पसरवल्याचा आरोप करत म्हणते, “तुझी पीआर एजन्सी खोटी माहिती पसरवत आहे. तुच नेमलेले लोक, तुझ्याकडून पगार घेणारे लोक तुला तुझ्याच घरात जाऊ देत नाही, काय गंमत आहे ना. खरं तर तुला एका चांगल्या पीआर एजन्सीची गरज आहे, ते तुझ्यासाठी चांगले प्लॅन्स करतील. काळजी करू नको नवाजुद्दीन सिद्दीकी, तुम्ही मला आणि माझ्या मुलांची हिंमत तोडू शकत नाही. आम्ही अशा देशाचे नागरिक आहोत, जिथे न्याय मिळतो आणि आम्हालाही लवकरच न्याय मिळेल.” असं आलिया सिद्दीकी या व्हिडीओत म्हणाली.

आलियाने यावेळी नवाजुद्दीनला भावाने घरात जाऊ न दिल्याच्या दाव्यावरूनही टीका केली. त्याच्याच घरात त्याला कोण रोखू शकतं, असं ती म्हणाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सोमठाणा गावात स्मशानभूमी नसल्याने गावकऱ्यांनी प्रेत ठेवले थेट ग्रामपंचायतमध्ये

आंदोलनानंतर बँकांची मराठींसाठी मेगाभरती? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Maharashtra Politics : निवडणुकीआधी अजित पवारांची ताकद वाढली, एकाचवेळी ४०० कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Mumbai Crime : मुंबईत रिक्षा चोरांचा सुळसुळाट; ७ ऑटोरिक्षा रस्त्यावरून लंपास, पोलिसांकडून दोघांना अटक

Reshma Shinde : अभिनेत्री रेश्मा शिंदे आई तुळजाभवानीच्या दर्शनाला, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT