Nawazuddin Siddiqui Defamation Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकीचा कौटुंबिक वाद पेटला; भावासह पत्नीवर केले गंभीर आरोप

Nawazuddin Siddiqui Defamation: नवाजने भावावर फसवणूक आणि पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.

Pooja Dange

Nawazuddin Siddiqui File case Against Brother: अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या काही दिवसांपासून कैटुंबिक वादामुळे चर्चेत आहे. त्याच्या पत्नीने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. हे प्रकरण सुरु असतानाच नवाजुद्दीनने आता त्याच्या भावावर खटला दाखल केला आहे.

मुंबई उच्च न्यायालयात नवाजुद्दीन सिद्दीकीने भाऊ शमसुद्दीनच्याविरुद्ध १०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे.नवाजने भावासह त्याची माजी पत्नी अंजना पांडे हिच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. नवाजने भावावर फसवणूक आणि पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणवर ३० मार्चला सुनावणी होणार आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीने याचिकेत म्हटले आहे की, जेव्हा शमशुद्दीनकडे काम नव्हते तेव्हा मी त्याला २००८ मध्ये मॅनेजर म्हणून कामावर ठेवले होते. तो ऑडिटिंग, आयकर भरणे आणि जीएसटी भरण्याचे काम पाहायचा. तसेच माझे अभिनयावर पूर्णपणे लक्ष केंद्रित व्हावे म्हणून मी माझ्या भावाला माझे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, स्वाक्षरी केलेले चेकबुक, बँक पासवर्ड, ईमेल आयडी यासारख्या गोष्टी दिल्या होत्या.

त्यानंतर शमसुद्दीनने माझी फसवणूक करण्यास सुरूवात केली, असे याचिकेत म्हटले आहे. नवाज त्याच्या नावावर संपत्ती घेत असल्याचे सांगून त्याच्या भावाने नवाज आणि त्याच्या नावावर संयुक्त मालमत्ता खरेदी केली. या मालमत्तांमध्ये एक फ्लॅट, यारी रोड येथील ऑफिस, बुलढाणा येथील जागा, शाहपूर येथील फार्म हाऊस, दुबईतील मालमत्ता आणि रेंज रोव्हर, बीएमडब्ल्यू, डुकाटीसह १४ वाहनांचा समावेश आहे.

नवाजने भाऊ आणि त्याची माजी पत्नी अंजना पांडे यांच्यावर २० कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोपही केला आहे. एवढेच नाही तर शमसुद्दीनने 2020 पासून नवाजसोबत काम करणे बंद केले होते, त्यानंतर नवाजला आयकर, जीएसटी आणि विविध सरकारी विभागांकडून 37 कोटी रुपयांच्या थकबाकीच्या नोटीसा आल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT