What The Hell Navya Season 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jaya Bachchan: लग्नानंतर रोमान्स कमी होतो, नव्या नवेलीच्या पॉडकास्टमध्ये असं का म्हणाल्या जया बच्चन?

What The Hell Navya Season 2: नेहमी सोशल मीडियावर नव्या नवेली नंदाची चर्चा होत असते. सध्या ती तिच्या पॉडकास्ट शो 'व्हॉट द हेल नव्या'मुळे चर्चेत आहे. आता या पॉडकास्टच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलरही रिलीज झाला आहे.

Priya More

Jaya Bachchan On After Marriage Romance:

बॉलिवूडचे 'महानायक' अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) जरी चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी बऱ्याचदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नेहमी सोशल मीडियावर नव्या नवेली नंदाची चर्चा होत असते. सध्या ती तिच्या पॉडकास्ट शो 'व्हॉट द हेल नव्या'मुळे चर्चेत आहे. आता या पॉडकास्टच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. यामध्ये ती तिची आजी अर्थात बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) आणि आई श्वेता नंदा (Shweta Nanda) यांच्यासोबत खूप मजा मस्ती करताना दिसत आहे.

'व्हॉट द हेल नव्या'च्या एपिसोडमध्ये जया बच्चन यांच्यासोबत त्यांची मुलगी आणि नात या तिघी खूपच मनोरंजक खुलासे करताना दिसत आहेत. यावेळी जया बच्चन यांनी नव्या आणि श्वेता यांना खूप शिव्या दिल्याबद्दल फटकारते आणि त्यांनी वैवाहिक जीवनातील अनुभव देखील शेअर केले आहेत. या ट्रेलरमध्ये जया बच्चन या लग्नाबद्दल बोलताना दिसत आहेत. लग्नानंतर रोमान्स संपतो असं त्यांनी वक्तव्य केले आहे. यासोबत आजी आणि नात बऱ्याच गोष्टीवर गप्पा मारताना दिसतात.

'व्हॉट द हेल नव्या'च्या ट्रेलरमध्ये, नव्या सांगते की आजी जयासाठी एक शब्द आहे 'जया-इंग'. याचं तिला थोडं आश्चर्य वाटतं. तर श्वेती तिची आई जयासारखी एक्सप्रेशन देण्याचा प्रयत्न करते. नव्या तिला 'टिचर' म्हणते. नव्या म्हणते की जया इंगचा अर्थ कोणाला निर्दश देणे अथवा एका टीचरसारखं वागणं असा होतो.

या पॉडकास्टमध्ये जया बच्चन या नव्या आणि श्वेता यांना सांगतात की, 'तुम्ही लोक खूप शिव्या देता.' त्याचवेळी नव्याने तिची आई श्वेता हिला सांगितले की, मलाही तुझी विनोदबुद्धी मिळाली आहे. दुसरीकडे, पुढच्या विषयावर जया म्हणत आहेत की, 'रोमान्स खिडकीतून बाहेर जातो. लग्नानंतर रोमानस पूर्णपणे संपतो.

नव्याच्या पॉडकास्टच्या या एपिसोडबद्दल सोशल मीडियावर उत्सुकता वाढली आहे. सध्या त्याचीच चर्चा होत आहे. सोशल मीडियावर युजर्सनी जया यांचे कमेंट्समध्ये कौतुक केले आणि म्हटले की, 'जया बच्चन यांचे स्मित अगदी ५० वर्षांपूर्वीच्या 'बावर्ची' चित्रपटाच्या दिवसांसारखे आहे.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'तिन्ही महिला असाधारण, बुद्धिमान आणि सुंदर आहेत. नव्याच्या पॉडकास्टची वाट पाहत आहे.' जया बच्चन यांची बोलण्याची शैली आजही सगळ्यांनाच प्रचंड आवडते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Archana Puran Singh: अर्चना पूरन सिंहला झालेला गंभीर CRPS आजार नेमका आहे तरी काय? जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Live News Update : जालन्यात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आधार, पॅन आणि मतदान कार्ड कचऱ्यात

Nose Blackheads Removal Tips: नाकावरचे ओपन पोअर्स कसे घालवायचे? घरगुती 4 सोपे उपाय करा

Women Health Care: महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची; स्त्रीरोग तज्ज्ञांनी सांगितलं 'हे' सल्ले

Mumbai Crime : समलैंगिक प्रेमाचा धक्कादायक शेवट! घरी जाण्यास नकार दिला, पार्टनरने छातीत चाकू खुपसला अन्...

SCROLL FOR NEXT