Navra Maza Navsacha 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Navra Mazha Navsacha 2 Collection: सुप्रिया-सचिन अन् अशोम मामांची जोडी बॉक्स ऑफिसवर गाजली; 'नवरा माझा नवसाचा २' चित्रपटाने पहिल्याच दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

Navra Mazha Navsacha 2 Box Office Collection: 'नवरा माझा नवसाचा २' चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली आहे.

Manasvi Choudhary

नवरा माझा नवसाचा या चित्रपटाची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता होती. गेल्या अनेक वर्षापासून या चित्रपटाच्या प्रतिक्षेत चाहते होते. अखेर ती वेळ आली आहे आणि 'नवरा माझा नवसाचा २' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांचा चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद आहे.

'नवरा माझा नवसाचा २' हा चित्रपट रिलीज झाला आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यासाठी तुफान गर्दी केली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली चांगली जादू दाखवली आहे.

'नवरा माझा नवसाचा २'हा २००४ च्या नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा दुसरा भाग आहे. तब्बल २० वर्षांनी आलेल्या या कॉमेडी चित्रपटाच्या रिलीजकडे प्रेक्षकांचे लक्ष होते. नुकतंच चित्रपट रिलीज झाला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने छप्परफाड कमाई केली याची आकडेवारी समोर आली आहे.

'नवरा माझा नवसाचा २' चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात जबरदस्त गर्दी आहे. १००० हून अधिक सिनेमागृहात हा चित्रपट रिलीज झाला आहे. मराठी चित्रपटाच्या यादीत या चित्रपटाची कामगिरी दमदार आहे.

माहितीनुसार, 'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी १ कोटी ७० लाखांची कमाई केली आहे. तसेच विकेंड असल्यामुळे या चित्रपटाला आणखी फायदा होण्याची शक्यता आहे. 'नवरा माझा नवसाचा २' चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, वैभव मांगले, निर्मिती जाधव आणि सिद्धार्थ जाधव ही तगडी स्टारकास्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway Mega Block: मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; घराबाहेर पडताना वेळपत्रक वाचा

Maharashtra Live News Update : नांदेडमध्ये 70 ते 75 जणांतून पाण्यातून विषबाधा

OPPO Find X9 Series: येणार येणार तुमचा फोटो भारीच येणार! दमदार कॅमेरावाला OPPO Find X9 Series च्या लॉन्चची तारीख आली समोर

Rishab Shetty : 'कांतारा'च्या यशानंतर ऋषभ शेट्टी पोहचला वाराणसीला, घेतले महादेवाचे दर्शन

Kalyan Crime: धक्कादायक! शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर हल्ला, कल्याणमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT