Navjot Singh Sidhu Wife Cancer SAAM TV
मनोरंजन बातम्या

Navjot Singh Sidhu Wife Cancer : नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीने केली स्टेज 4 कॅन्सरवर मात, जाणून घ्या काय होता डाएट प्लान

Navjot Kaur Cancer Fight : नवज्योत सिंग सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर यांनी स्टेज 4 कॅन्सरवर मात केली आहे. यासंबंधित सर्व माहिती स्वतः नवज्योत सिंग सिद्धू यांनी दिली आहे.

Shreya Maskar

आपल्या हटके शैलीने जगाला हसवणाऱ्या नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. त्यांची बायको गेल्या दोन वर्षांपासून आयुष्याशी झुंज देत आहे. कारण त्या गेले दोन वर्ष कर्करोगाने ग्रस्त होत्या. त्यांचा कॅन्सर (Cancer ) स्टेज ४ चा होता. आता मात्र त्यांनी यावर मात केली आहे.

अलिकडे झालेल्या मिडिया मुलाखतीत त्यांनी पत्नीचा हेल्थ अपडेट चाहत्यांसोबत शेअर केली. त्यांनी सांगितले की, "आम्ही आशा न सोडता नेहमी ट्रिटमेंट घेत राहिलो आणि अखेर माझ्या पत्नीने कॅन्सरवर मात केली आहे." नवज्योतसिंग सिद्धूच्या पत्नीने कॅन्सरमधून बाहेर येण्यासाठी आयुर्वेद जीवनशैली स्वीकारली होती. नवज्योत कौर यांनी फक्त 40 ते 50 दिवसात कॅन्सरवर मात केली आहे.

नवज्योत कौर यांचा डाएट प्लान

नवज्योत कौर (Navjot Kaur) यांच्या कॅन्सरच्या लढ्यात आयुर्वेदाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांना कडुलिंबाची पाने, हळद, दालचिनी इतर अनेक आयुर्वेदिक मसाल्यांचा रस प्यायला देत असे. तसेच त्या भरपूर फळे देखील खात असे. यात विशेषता बीटरूट, गाजर, आवळा यांचा समावेश होता. त्यांनी कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांचे सेवन बंद केले होते. कारण कार्बोहायड्रेट कॅन्सरला प्रोत्साहन देतात. तसेच प्रक्रिया केलेले पदार्थ, रिफाइंड तेल, मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळले होते.

नवज्योतसिंग सिद्धू यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, त्यांचा पत्नी रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून प्यायची. त्यानंतर ड्रायफ्रूट्स खायची. कारण ड्रायफ्रूट्स आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. ज्यामुळे कॅन्सरवर मात करण्यास मदत मिळते. तसेच त्या कडुलिंबाची पाने देखील खात असे.

हर्बल चहाचे सेवन त्या नियमित करायच्या. तसेच जेवण आम्ही खोबरेल तेलात शिजवत असे. तसेच सूर्यास्तानंतर जेवण करू नये. आंबट आणि कडू पदार्थ कॅन्सरवर मात करण्यास फायदेशीर ठरतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

SCROLL FOR NEXT