Girija Oak saam tv
मनोरंजन बातम्या

Girija Oak : पॅनिक अटॅक यायचे, अस्वस्थ वाटायचे; आईवडिलांच्या घटस्फोटानंतर 'अशी' झाली होती गिरिजाची अवस्था

Girija Oak Talk About Parents Divorce : नॅशनल क्रश गिरिजा ओकने पहिल्यांदाच आईवडिलांच्या घटस्फोटावर भाष्य केले. आईवडिलांच्या घटस्फोटाचा गिरिजावर कसा परिणाम झाला, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

नॅशनल क्रश गिरिजा ओक ही ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांची मुलगी आहे.

निळ्या साडीमुळे गिरिजा ओक रातोरात नॅशनल क्रश बनली.

आईवडिलांच्या घटस्फोटाचा गिरिजाच्या मानसिकतेवर गंभीर परिणाम झाला होता.

रातोरात नॅशनल क्रश बनलेली मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक ही ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांची मुलगी आहे. गिरीश ओक यांच्या पहिल्या बायकोचे नाव पद्मश्री पाठक आहे. गिरिजा ओक ही अभिनेते गिरीश आणि पद्मश्री यांची मुलगी आहे. लग्नानंतर काही वर्षांनी गिरिश ओक आणि पद्मश्री यांच्यात मतभेद झाले आणि त्यांनी घटस्फोट घेतला. काही काळाने गिरीश ओक यांनी दुसरे लग्न केले. अलिकडेच झालेल्या मुलाखतीत गिरिजा आपल्या वैयक्तिक आयुष्यावर बोलली आहे.

'हॉटरफ्लाय' या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत गिरिजा ओकने आपल्या आईवडिलांचा घटस्फोटावर भाष्य केले. गिरिजानी मुलाखतीत सांगितल्यानुसार, गिरिजाच्या आई वडिलांमध्ये खूप मतभेद होते आणि याची कल्पना गिरिजाला होती. काही काळाने गिरिजाच्या आई वडिलांनी घटस्फोट घेतला. आई-वडिलांच्या घटस्फोटाचा गिरिजाच्या मानसिकतेवर वाईट परिणाम झाला. तिला पॅनिक अटॅक यायचे, ती अस्वस्थ व्हायची. तिला या गोष्टीचा खूप ताण होता. गिरिजा डॉक्टरांचा सल्ला घेऊन थेरेपी आणि मेडिकेशन सुरू केलं.

गिरिजाने मुलाखतीत सांगितले की, "मी एका घटस्फोटित आईवडिलांची मुलगी असल्याचे ओझे घेऊन जगत होते..." गिरिजा लहानपणी विचार करायची की, मी माझं लग्न टिकवून दाखवेन. तिचा रिलेशनशिपकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. गिरिजाने आपल्याला मित्राशी लग्न केलेल आणि आता सुखाने संसार करत आहे. गिरिजा आणि सुहृद गोडबोले यांच्या लग्नाला आता 14 वर्ष पूर्ण झाली आहेत.

गिरिजाने मुलाखतीत सांगितले की, "मी एका घटस्फोटित आईवडिलांची मुलगी असल्याचे ओझे घेऊन जगत होते..." गिरिजा लहानपणी विचार करायची की, मी माझं लग्न टिकवून दाखवेन. तिचा रिलेशनशिपकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. गिरिजाने आपल्याला मित्राशी लग्न केलेल आणि आता सुखाने संसार करत आहे. गिरिजा आणि सुहृद गोडबोले यांच्या लग्नाला आता 14 वर्ष पूर्ण झाली आहेत.

गिरिजा ओक अभिनेत्रीसोबत एक उत्तम गायिका देखील आहे. तिच्या निळ्या साडीतील फोटोंमुळे गिरिजा ओक 'नॅशनल क्रश' बनली. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. तिने मराठीसोबतच हिंदी इंडस्ट्रीत देखील नाव कमावले आहे. तिने किंग खानसोबत काम केले आहे. तिने अनेक मालिका, चित्रपट, नाटक यांमध्ये काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priyanka Chopra: प्रियांकाने निकला खायला घातला हजमोला; अमेरिकन नवऱ्याचा मजेदार किस्सा सांगितला देसी गर्लने, पाहा व्हायरल VIDEO

Crime: भररस्त्यात रक्तरंजित थरार, गोळ्या झाडून तरुणाची हत्या; जालना हादरले

मोठी बातमी! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार, २ दिवसांत घोषणा होईल; बड्या नेत्याचा दावा|VIDEO

Maharashtra Live News Update: भाजप पाठोपाठ पुण्यात शिवसेनेची आज बैठक

Office Wear Mangalsutra Designs: ऑफिससाठी बेस्ट आहेत 'हे' 5 मंगळसूत्र, तुमच्या वेस्टर्न आणि पारंपारिक लूक शोभून दिसतील

SCROLL FOR NEXT