Shreya Maskar
निळ्या रंगीच्या साडीतील फोटो आणि व्हिडीओ जगभरात तुफान व्हायरल झाले आणि मराठमोळी अभिनेत्री रातोरात 'नॅशनल क्रश' बनली. ही स्टार दुसरी-तिसरी कोणी नसून गिरिजा ओक आहे.
गिरिजा ओक सोशल मीडियावर चांगली सक्रिय दिसते. तिच्या मुलाखतींचे व्हिडीओ, फोटोशूट, गाण्यांचे व्हिडीओ, दैनंदिन आयुष्यातील काही घडामोडी यांसंबंधित फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
नुकतेच 'नॅशनल क्रश' गिरिजा ओकने सुंदर बॉसी लूकमध्ये फोटोशूट केले आहे. तिचा हा अंदाज चाहत्यांना भलताच आवडला आहे. सुंदर फोटो पाहा.
गिरीजा ओकने स्टायलिश निळ्या रंगाचा Cord Set परिधान केला आहे. त्यावर निळ्या रंगाचे गोल्डन चेक्स लाइन्स असलेले जॅकेट परिधान केले आहे.
ग्लॉसी मेकअप, मिनिमल ज्वेलरी, केसांची पोनी बांधून तिने हा लूक पूर्ण केला आहे. गिरीजाचा हा बॉसी अंदाज नेटकऱ्यांना खूप आवडला आहे.
गिरीजा ओकने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. "इंटरनॅशनल क्रश", "खूप सुंदर", "स्मार्ट लूक", "खूपच अप्रतिम दिसत आहेस", "अप्रतिम", "मोहक"," शानदार", "लव्ह यू" अशा कमेंट्स येत आहेत.
नुकताच गिरीजाचा सुंदर गाण्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यात ती "रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना..." हे लोकप्रिय मराठी गाताना दिसत आहे.
गिरीजा ओक अनेक मराठी मालिका, नाटक , चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तिने हिंदी चित्रपटसृष्टी देखील गाजवली आहे. गिरीजा ओकने 'जवान' मध्ये बॉलिवूडचा किंग शाहरुख खानसोबत काम केले आहे.