Madhuri Dixit : कोकणात घरोघरी बनवला जाणारा 'हा' पदार्थ 'धकधक गर्ल'ला खूप आवडतो

Shreya Maskar

माधुरी दीक्षित

माधुरी दीक्षित लवकरच 'मिसेस देशपांडे' या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही सायकोलॉजिकल थ्रिलर सीरिज आहे. चाहते याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Madhuri Dixit | instagram

'मिसेस देशपांडे

'मिसेस देशपांडे' वेब सीरिजचे दिग्दर्शक नागेश कुकुनूर आहे. ही सीरिज 19 डिसेंबरपासून जिओ हॉटस्टारवर पाहता येणार आहे.

Madhuri Dixit | instagram

कोकणी पदार्थ

माधुरी दीक्षितने एका मिडिया मुलाखतीत आपल्या जेवणाच्या आवडी निवडीबद्दल सांगितले आहे. तिला कोकणात बनवला जाणारा एक गोड पदार्थ खूप आवडतो.

Madhuri Dixit | instagram

महाराष्ट्रीयन फूड

महाराष्ट्रात रोजच्या जेवणात घरोघरी बनवला जाणारा 'वरण-भात' माधुरी दीक्षितचा खूप फेव्हरेट आहे. ती हे जेवण कधीही जेवू शकते. वरण-भात माधुरीचे Comfort फूड आहे.

Madhuri Dixit | instagram

Comfort फूड

वरण-भातावर तूप, लिंबाचा रस टाकून खायला अभिनेत्रीला खूप आवडतो. तसेच त्या म्हणाल्या की, "जेव्हा मला बरं वाटत नाही तेव्हा मी आवर्जून वरण भात बनवून खाते."

Madhuri Dixit | instagram

कोकणी गोड पदार्थ

तसेच माधुरी दीक्षितला कोकणात बनवले जाणारे 'ओल्या खोबऱ्याचे उकडीचे मोदक' खूप आवडतात. 'धकधक गर्ल'ला उकडीचे मोदक बनवता देखील येतात.

Madhuri Dixit | instagram

कोणते पदार्थ बनवता येतात?

माधुरी दीक्षितने मुलाखतीत सांगितले की, "मला साबुदाणा खिचडी, भाज्या, पोहे हे पदार्थ खूप छान बनवता येतात...शेंगदाणे घातलेली साबुदाणा खिचडी मला खूप आवडते.

Madhuri Dixit | instagram

माधुरी दीक्षित- डॉ. नेने

माधुरी दीक्षित यांनी सांगितल्यानुसार, डॉ. नेने त्यांच्यापेक्षा चांगले आणि स्वादिष्ट जेवण बनवतात. एकंदर या बॉलिवूड कपला महाराष्ट्रीयन जेवण आणि चविष्ट पदार्थ खूप आवडतात.

Madhuri Dixit | instagram

NEXT : "कोई इतना खूबसूरत..."; 'धकधक गर्ल'च्या सौंदर्याने केलाय कहर

Madhuri Dixit | instagram
येथे क्लिक करा...