१३ ऑक्टोबर म्हणजे शुक्रवारी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जाणार आहे. या दिनानिमित्त देशभरातील चित्रपटगृहांमध्ये फक्त 99 रुपयांमध्ये प्रेक्षकांना त्यांच्या आवडते चित्रपट पाहायला मिळणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत फक्त ९९ रुपयांमध्ये तुमच्या आवडत्या चित्रपटांचा आनंद घेता येणार आहे.
नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आणि काही दिवसांपूर्वी रिलीज झालेले चित्रपट पाहण्याचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे. शुक्रवारचा दिवस चित्रपटप्रेमींसाठी खास मेजवाणी असणार आहे. राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त (National Cinema Day 2023) कोण-कोणते चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत...
राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त 'फुकरे' फ्रँचायझी चित्रपटाचा तिसरा भाग असलेल्या 'फुकरे 3' चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मृगदीप सिंग लांबा दिग्दर्शित या चित्रपटात पंकज त्रिपाठी, ऋचा चढ्ढा, पुलकित सम्राट, वरुण शर्मा आणि मनजोत सिंग हे कलाकार मुख्य भुमिकेत आहेत.
राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त प्रेक्षकांना 'द व्हॅक्सिन वॉर' चित्रपट पाहायला मिळणार आहे. निर्माता-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी एक सत्यकथा 'द व्हॅक्सिन वॉर' रुपेरी पडद्यावर आणली आहे. या चित्रपटात अनुपम खेर, नाना पाटेकर आणि पल्लवी जोशी मुख्य भुमिकेत आहेत.
राजश्री प्रॉडक्शनच्या बॅनरखाली अवनीश बडजात्या दिग्दर्शित 'दोनो' ही नवीन काळातील प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला आली. राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त प्रेक्षकांना हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात कनिका कपूर, रोहन खुराना, पूजन छाबरा, आदित्य नंदा आणि माणिक पापानेजा हे मुख्य भुमिकेत आहेत.
अभिनेता अक्षय कुमारच्या 'मिशन राणीगंज - द ग्रेट भारत रेस्क्यू' चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. टिनू सुरेश देसाई दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमारसोबत परिणीती चोप्रा, मुकेश एस भट्ट, कुमुद मिश्रा, पवन मल्होत्रा, रवी किशन हे मुख्य भुमिकेत आहेत.
अनिल कपूरची मुलगी रिया कपूरने जितेंद्र यांची मुलगी एकता कपूरसोबत 'थँक यू फॉर कमिंग' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाची कथा एका तीस वर्षांच्या महिलेची आहे. जी लैंगिक सुख मिळवण्याचा प्रयत्न करते. पण तिला समाधान मिळत नाही. या चित्रपटात भूमी पेडणेकर, डॉली सिंग, कुशा कपिला, शिबानी बेदी, प्रद्युमन सिंग मॉल, नताशा रस्तोगी, गौतमिक, सुशांत दिवगीकर, सलोनी डेनी, डॉली अहलुवालिया, करण कुंद्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
'800' हा चित्रपट क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक विकेट घेणारा क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन यांच्या जीवनावर आधारित बायोपिक आहे. मुथय्या मुरलीधरनचा संघर्ष आणि वेदनादायी कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. एका कसोटी सामन्यात आठशे बळी घेण्याचा विश्वविक्रम मुथय्या मुरलीधरन यांच्या नावावर आहे. त्यामुळेच या चित्रपटाचे नाव '800' ठेवण्यात आले आहे. या चित्रपटात मधुर मित्तलने क्रिकेटर मुथय्या मुरलीधरनची भूमिका साकारली आहे.
दिग्दर्शक डेव्हिड गॉर्डन ग्रीनचा 'द एक्सॉर्सिस्ट: बिलीव्हर' हा एक भयपट चित्रपट आहे. चित्रपटाची कथा एंजेला आणि तिची मैत्रिण कॅथरीन यांच्याभोवती फिरते. जिच्यावर राक्षसीपणाची लक्षणे दिसतात. हा चित्रपट 'द एक्सॉर्सिस्ट' फ्रँचायझीची सहावी सीरिज आहे. या चित्रपटात एलेन बर्स्टीन, लेस्ली ओडोम जूनियर, अॅन डाऊड, जेनिफर नेटल्स, नॉर्बर्ट लिओ बट्झ, लिडिया ज्युवेट आणि ऑलिव्हिया मार्कम यांच्या भूमिका आहेत.
दिग्दर्शक क्रेग गिलेस्पी यांच्या 'डंब मनी' चित्रपटाची कथा किथ गिल नावाच्या एका सामान्य माणसाभोवती फिरते. जो आपल्या आयुष्यातील संपूर्ण बचत एका कंपनीत गुंतवतो. त्याची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होताच त्याचे आयुष्य आणि त्याला फॉलो करणाऱ्या प्रत्येकाचे आयुष्य बदलून जाते आणि प्रत्येकजण श्रीमंत होतो.
'धक धक' चित्रपटाची निर्मिती तापसी पन्नूने केली आहे. बाईकला आपल्या आयुष्यात महत्त्व देणाऱ्या चार महिलांचा प्रवास या चित्रपटामध्ये दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात दिया मिर्झा, फातिमा सना शेख, रत्ना पाठक शाह आणि संजना संघी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण दुडेजा यांनी केले आहे.
'पॉ पेट्रोल: द माइटी मूव्ही' हा कॅनडियन कम्प्यूटर-अॅनिमेटेड सुपरहिरो कॉमेडी चित्रपट आहे. जो कॅल ब्रंकर दिग्दर्शित Paw Patrol या टेलिव्हिजन मालिकेवर आधारित आहे. अॅडव्हेंचर सिटीवर उल्का पडल्यानंतर पाव पेट्रोलच्या पिल्लांना मिळणाऱ्या चमत्कारिक शक्तींवर चित्रपटाची कथा आधारित आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.