Gautami Patil: गौतमीचं 'मार्केट डाऊन' होणार?, सोलापूर पोलिसांनी नाकारली कार्यक्रमाला परवानगी; कारण काय?

Solapur Police Banned Gautami Patil Program: गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला वेगवेगळ्या शहारांमध्ये बंदी घालण्यात येत आहे. त्यामुळे तिचे चाहते नाराज होत आहेत.
Gautami Patil
Gautami Patil Saam TV

Solapur Police:

'सबसे कातिल गौतमी पाटील' च्या तालावर आज संपूर्ण महाराष्ट्र नाचत आहे. या गौतमी पाटीलबाबतच (Gautami Patil) महत्वाची माहिती समोर आली आहे. कोल्हापूर (Kolhapur), सिंधुदुर्गपाठोपाठ (Sindhudurg) आता सोलापूर (Solapur) पोलिसांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे गौतमीसह तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला वेगवेगळ्या शहारांमध्ये बंदी घालण्यात येत आहे. त्यामुळे तिचे चाहते नाराज होत आहेत.

Gautami Patil
Tujhe Yaad Na Meri Aayee 2.0 News: ‘तुझे याद ना मेरी आई’ या गाण्याचं रिमिक्स न्यू व्हर्जन येणार, राहुल, अंजली आणि टीनाचा लव्ह ट्रँगल पाहायला मिळणार

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरमध्ये गौतमी पाटील 'डिस्को दांडिया' कार्यक्रमाला हजेरी लावणार होती. पण सोलापूर पोलिसांनी गौतमी पाटीलच्या या कार्यक्रमाची परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण सांगत सोलापुरातील विजापूरनाका पोलिसांनी या कार्यक्रमाची परवानगी नाकारली आहे.

सोलापूर शहरातील स्थानिक डिजिटल वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या 'डिस्को दांडिया' कार्यक्रमाला गौतमी पाटील प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित राहणार होती. नवरात्र काळात पोलिसांकडील मनुष्यबळ बंदोबस्तासाठी वापरले जाणार असल्याने गौतमीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Gautami Patil
National Cinema Day 2023: चित्रपटप्रेमींसाठी जबरदस्त मेजवाणी! उद्या फक्त ९९ रुपयांमध्ये खरेदी करा 'या' चित्रपटांचे तिकीट, पाहा संपूर्ण लिस्ट...

गौतमीच्या या कार्यक्रमाची सोलापूरमध्ये खूपच चर्चा झाली होती. या कार्यक्रमाला जाण्यासाठी सर्वजण खूपच उत्सुक होते. पण आता गौतमी कार्यक्रमाला येणार नसल्यामुळे तिचे चाहते आणि सोलापूरकर नाराज झाले आहेत. दरम्यान, यापूर्वी सिंधुदुर्गमध्ये गौतमीच्या कार्यक्रमाला बंदी घालण्यात आली होती. सिंधुदुर्गातील कडाळ आणि कणकवलीमध्ये गौतमीच्या डीजे डान्स शोचे आयोजन करण्यात आले होते. मात्र गौतमीच्या या कार्यक्रमाला विरोध करत नेटिझन्सनी टीकेची झोड सुरू केली. या कार्यक्रमाला होणारा विरोध लक्षात घेता आयोजकांनी तांत्रिक कारण देत कार्यक्रम रद्द केला होता.

Gautami Patil
Saba Azad Trolled: ‘डान्स पाहून हृतिकलाही लाज वाटेल...’, सबा आझाद अनोख्या रॅम्पवॉकमुळे ट्रोल, अभिनेत्रीनं असं काय केलं?

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोल्हापूर पोलिसांनी गौतमीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील करवीर आणि राधानगरी तालुक्यात गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गणेशोत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करु नये असे आवाहन जिल्हा पोलिस अधिकारी महेंद्र पंडीत यांनी केले होते. गौतमीच्या कार्यक्रमाला पोलिसांचा कडक बंदोबस्त असतो. गणेशोत्सव काळात पोलिसांवर बंदोबस्ताचा प्रचंड ताण असतो. त्यामुळे गौतमीच्या कार्यक्रमाची परवानगी नाकारण्यात आली होती.

Gautami Patil
Madhuri Pawar Post: ‘रानबाजार’ फेम अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर; भावाचा आकस्मिक मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com