Marathi Movie Sumi Poster Released Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sumi Marathi Movie: ध्येयवेड्या मुलीची गोष्ट सांगणार 'सुमी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, ओटीटीवर होणार प्रदर्शित

'सुमी' ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२२ मध्ये 'सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट' ठरला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sumi Marathi Movie Poster Released: मराठी चित्रपट सृष्टीतही अनके उत्तम आशय असलेले चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीतला येत असतात. अशाच एका चित्रपटाचे पोस्ट नुकतेच प्रदर्शित झाले आहे. 'सुमी' असे या चित्रपटाचे नाव आहे. अक्षय विलास बर्दापूरकर आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत हर्षल कामत एंटरटेनमेंट व गोल्डन माउस प्रॉडक्शन निर्मित हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'सुमी' चित्रपटाच्या पोस्टरमध्ये आनंदी, मनमुराद हसणारी 'सुमी' दिसत आहे. एका महत्वाकांक्षी, ध्येयनिष्ठ मुलीची कहाणी असलेल्या या चित्रपटाला राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आले आहे. 'सुमी' ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२२ मध्ये 'सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट' ठरला असून या चित्रपटातील आकांक्षा पिंगळे व दिव्येश इंदुलकर 'सर्वोत्कृष्ट बाल कलाकार' या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. 'सुमी'मध्ये स्मिता तांबे, नितीन भजन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अजय गोगावले यांनी या चित्रपटात गाणं गायले आहे. संगीतकार रोहन-रोहन यांनी या चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. 'सुमी' लवकरचं प्लॅनेट मराठी ओटीटीच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला येणार आहे.

प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांनी या चित्रपटावर प्रतिक्रिया दिले आहे. "’सुमी' सारख्या विलक्षण, प्रायोगिक कथा असलेला चित्रपट जागतिक व्यासपीठास पात्र आहे. प्रेक्षकांना वेगवेगळे आशय देऊन मनोरंजन करणे आमचं कर्तव्य आहे. ‘सुमी’ची ही गोड कहाणी सर्वांनाच आवडेल. 'सुमी' लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रेक्षकांना भेटायला येणार आहे", असे अक्षय बर्दापूरकर म्हणाले आहेत. (OTT)

दिग्दर्शक अमोल गोळे यांनी चित्रपटाविषयी सांगताना म्हटले आहे की, " 'सुमी' चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार विजेता ठरला आणि आता या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद बघून आनंद होतोय. प्लॅनेट मराठीच्या साथीने आम्ही 'सुमी'ला तुमच्या भेटीला घेऊन येत आहोत. एक ध्येयवेडी मुलगी म्हणजे ‘सुमी’. तुमच्या आमच्यातलीच ध्येयाचा ध्यास पूर्ण करणारी ‘सुमी’ लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.’’ (Movie)

अक्षय विलास बर्दापूरकर आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत हर्षल कामत एंटरटेनमेंट व गोल्डन माउस प्रोडक्शन निर्मित 'सुमी' या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल वसंत गोळे यांनी केले आहे. हर्षल कामत, स्वाती एस. शर्मा, मिहिर कुमार शर्मा हे निर्माते असून अंजली आनंद पांचाळ, जयादित्य गिरी, जयंत येवले व सोनाली जयंत हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची मूळ कथा - पटकथा संजीव झा यांची आहे. प्रसाद नामजोशी यांनी या चित्रपटाचे संवाद व गीत प्रसाद नामजोशी यांचे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

SCROLL FOR NEXT