Ashok Kharat Case Pravin Tarde Reaction Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ashok Kharat Case: ...कंबरड्यात लाथ घालायला पाहिजे...; भोंदूबाबा खरातचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेता संतापला

Ashok Kharat Case: नाशिक भोंदू बाबा प्रकरणावर प्रवीण तरडे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत अंधश्रद्धेविरोधात आवाज उठवला आहे. मुख्यमंत्र्यांच्या कारवाईचे कौतुक करत त्यांनी समाजाला जागरूकतेचा संदेश दिला.

Shruti Vilas Kadam

Ashok Kharat Case: नाशिकमध्ये समोर आलेल्या भोंदू बाबांच्या प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. यावर आता मराठी अभिनेते-दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी ठाम आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे. पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी या संपूर्ण प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.

प्रवीण तरडे म्हणाले की, “नाशिकमध्ये घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. अशा प्रकारच्या घटना समाजासाठी घातक असून, यामुळे अंधश्रद्धेला खतपाणी मिळते.” त्यांनी राज्य सरकारने घेतलेल्या तातडीच्या निर्णयांचेही कौतुक केले. विशेषतः मुख्यमंत्र्यांनी केलेल्या जलद कारवाईबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत, “ज्या पद्धतीने कारवाई व्हायला हवी, त्याच पद्धतीने ती झाली आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक स्पष्ट करत महत्त्वाचे विधान केले. “श्रद्धा ही नेहमी शुद्ध आणि पवित्र असते. आपण जे काही काम श्रद्धेने करतो, ते तितकेच पवित्र असते. मात्र, अंधश्रद्धा ही कोणत्याही स्वरूपात वाईटच असते. तिच्या कंबरड्यात लात घातली पाहिजे,” असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.

नाशिकमधील या प्रकरणामुळे पुन्हा एकदा अंधश्रद्धेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. समाजात अजूनही काही लोक अशा भोंदू बाबांच्या जाळ्यात अडकत असल्याचे वास्तव या घटनेतून समोर आले आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तींविरोधात कठोर कारवाई करण्याची गरज अधोरेखित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG New Rules : ...तर तुमचं LPG कनेक्शन होईल बंद; सरकारचे नवे नियम लागू, हे महत्वाचं काम झटपट कराच

Maharashtra News Live Update: जालन्यातील बदनापूर शहरात धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात शिवप्रेमी आक्रमक

बीडच्या परळीत आता सोमवारी मांस विक्रीवर बंदी, पालिकेनं का घेतला निर्णय?

Sugarcane Juice Side Effects: उन्हाळ्यात उसाचा रस कोणी पिऊ नये?

HSC Result 2026 : बारावीचा निकाल इतका का घसरला? बोर्डाने सांगितलं नेमकं कारण, वाचा

SCROLL FOR NEXT