Nana Patekar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या मनात होती चिंता! मुलगा मल्हारने भावुक होऊन सांगितला वडिलांसोबतचा अखेरचा संवाद

Nana Patekar: नाना पाटेकर यांच्यासोबतचा अखेरचा संवाद काय झाला होता? सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार करण्यामागचे कारण आणि नाम फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याबाबत मुलगा मल्हार पाटेकरने माध्यमांनी माहिती दिली.

Shruti Vilas Kadam

Nana Patekar: हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ८ ऑक्टोबर रोजी पुण्याजवळील डोणजे गावातील त्यांच्या ‘नानाची वाडी’ या फार्महाऊसजवळ रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नानांचा एकुलता एक मुलगा मल्हार पाटेकरने वडिलांच्या अखेरच्या दिवसांतील आठवणी सांगितल्या. वडिलांसोबत शेवटचं काय बोलणं झालं, याबाबत मल्हारने माध्यमांशी संवाद साधला.

वडिलांसोबतचा शेवटचा संवाद

नाना पाटेकरांच्या पार्थिवावर अग्नी दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना मल्हारने नानांसोबत झालेल्या अखेरच्या संवादाची आठवण सांगितली. यावेळी मल्हार भावूक झाला. त्याने सांगितले की, शेवटचं बोलताना नानांना स्वतःपेक्षा माझ्या तब्येतीची जास्त काळजी होती. काही दिवसांपासून माझी तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे नाना माझ्या प्रकृतीबाबत चिंतेत होते. मला त्यांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले होते. वडिलांचे हे शब्द माझ्यासाठी अत्यंत मोलाचे आहेत, असे ते म्हणाले.

सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार का केले?

नाना पाटेकर यांचे पार्थिव गोव्याहून त्यांच्या गावी आणण्यात आले. मात्र, प्रवासासाठी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागल्याने अंत्यसंस्कार रात्री करावे लागल्याचे मल्हारने सांगितले. याबाबत बोलताना तो म्हणाला, 'आम्ही गोव्यात होतो आणि त्यांचे पार्थिव गावात आणायचे होते. आम्हाला लवकर पोहोचता येईल असे वाटले होते; पण त्यासाठी काही वेळ लागला. त्यांचे सकाळीच निधन झाले होते आणि तोपर्यंत बराच वेळ निघून गेला होता. पार्थिव जास्त वेळ ठेवणे योग्य नव्हते. त्यामुळे सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार करावे लागले.'

‘नानांसारखी माणसं कधीच जात नाहीत’

वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना मल्हार म्हणाला की, नानांसारखी माणसं त्यांच्या कामामुळे नेहमी लोकांच्या मनात जिवंत राहतात. समाजातील लोकांनी एकत्र यावे आणि जग अधिक चांगले बनवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी नानांची विचारसरणी होती. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे घेऊन जाणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.

नाम फाऊंडेशनचे काम सुरू राहणार

नाना पाटेकर यांनी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून पाणी संवर्धन, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात महत्त्वाचे सामाजिक कार्य केले. वडिलांनी या कामांच्या पुढील जबाबदाऱ्या संबंधित सहकाऱ्यांकडे सोपवल्या होत्या. मराठवाड्यातील काम पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याचेही मल्हारने सांगितले. फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम असेच पुढे सुरु राहिलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Airport : विमानतळाचे नाव बदलले, आता नरेंद्र मोदींच्या नावाने ओळखले जाणार; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: मराठवाड्यात महायुतीचा मोठा ट्विस्ट! भाजप बंडखोर एम. के. देशमुखांची माघार; सतीश चव्हाणांचा मार्ग मोकळा

Brisk Walking: वजन कमी करण्यासाठी सकाळी 'या' पद्धतीनं चाला, चरबी मेणासारखी वितळेल, राहाल फिट अँड फाइन

Wardrobe Organization : कपाटात कपड्यांचा ढीग होतोय का? कमी जागेतही कपडे नीट ठेवण्यासाठी वापरा या 8 स्मार्ट टिप्स

Coconut Juice Benefits: रिकाम्यापोटी नारळ पाणी प्यावे की नाही?

SCROLL FOR NEXT