Nana Patekar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nana Patekar: नाना पाटेकरांना हार्ट अटॅक कशामुळे आला? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सत्य आलं समोर?

Nana Patekar: नाना पाटेकर यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, ७५ वर्षीय नाना पाटेकर यांना 'कोरोनरी आर्टरी डिसीज' आजार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Shruti Vilas Kadam

Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी ८ ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या रिपोर्टनुसार, त्यांना ‘कोरोनरी आर्टरी डिसीज’ (CAD) म्हणजेच हृदयाच्या रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार होता. हृदयाच्या धमनीमध्ये रक्ताची गुठळी तयार झाल्यामुळे रक्तपुरवठा थांबल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे रिपोर्टमधून स्पष्ट झाले आहे.

हृदयाच्या धमनीत रक्ताची गुठळी?

दिलेल्या माहितीनुसार, हृदयाच्या मुख्य धमनीमध्ये रक्ताची गुठळी तयार झाल्यामुळे हृदयाच्या स्नायूंना होणारा रक्तपुरवठा थांबला गेला. परिणामी, हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन हृदयाचे कार्य बंद पडल्याचे रिपोर्टमध्ये लिहण्यात आले आहे. गोवा मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांच्या पथकाने पोस्टमॉर्टम रिपोर्ट प्रशासनाकडे सादर केले आहे.

पहाटे प्रकृती बिघडल्याचा दावा

मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यूच्या काही तास आधी नाना पाटेकर यांनी अस्वस्थ वाटत असल्याचा मेसेज त्यांनी आपल्या मित्राला पाठवला होता. पहाटेच्या सुमारास मित्र त्यांच्या निवासस्थानी पोहोचला असता ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर गार्डच्या मदतीने त्यांना वैद्यकीय पथकाला बोलवण्यात आले. रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने त्यांना वाचवण्यासाठी सीपीआर (CPR) दिला होता. सुमारे ४५ मिनिटे प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळाला नसल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात आणताना नाना पाटेकर मृत अवस्थेत असल्याचे नोंदवण्यात आल्यामुळे पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अंतर्गत अनैसर्गिक मृत्यूची नोंद केल्याचे सांगितले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजपने आणीबाणीलाही मागे टाकले, आशुतोष रांकांचा गंभीर आरोप

Weekly Horoscope: कर्क, सिंह आणि कन्या राशींच्या आयुष्यात काय घडणार? जाणून घ्या आठवड्याचे भविष्य

Kitchen Ota Cleaning Trick : किचनचा ओटा स्वच्छ करण्याची स्मार्ट ट्रिक, तेलाचे हट्टी डाग अन् चिकटपणा चुटकीसरशी होईल गायब

IPS Officer Transfer: १३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, पोलिस दलात खळबळ; कुणाची कुठे नियुक्ती?

Entertainment News : अभिनेत्री सुरुची अडारकर आणि पियुष रानडे यांच्या घरी चिमुकलीचे आगमन

SCROLL FOR NEXT