Dolly Chaiwala Income SAAM TV
मनोरंजन बातम्या

Dolly Chaiwala Income : नागपुरच्या डॉली चायवाल्याची परदेशात हवा, कमाई ऐकून तुम्हीही व्हाल चकीत

Dolly Chaiwala : नागपुरचा डॉली चायवाला सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. तो अनेक परदेशी ट्रिप करत आहे. चला तर मग आज त्याची कमाई जाणून घेऊयात.

Shreya Maskar

डॉली चायवाला (Dolly Chaiwala) गेल्या अनेक महिन्यांपासून सोशल मिडियावर खूप लोकप्रिय झाला आहे. डॉली चायवाल्याचा मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांना चहा देतानाचा व्हिडिओ व्हायरल होताच त्याच्या प्रसिद्धीने शिखर गाठले. बिल गेट्सचा चहा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की एक सामान्य चहा विक्रेता हिरो बनला.

डॉली चायवाला या नावाने प्रसिद्ध असलेला सुनील पाटील सध्या इंस्टाग्राम खूप लोकप्रिय होत आहे. अलीकडेच एका फूड व्लॉगरने डॉली चायवाल्या संबंधित मोठे खुलासे केले आहेत. हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.

डॉली चायवाल्याचे इंस्टाग्रामवर 4.2 मिलियन फॉलोवर्स आहेत. तो सोशल मिडियावर देखील खूप सक्रिय असतो. आपल्या परदेश ट्रिपचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. अनेक मोठ्या कार्यक्रमांना त्याला बोलावले जाते. तसेच तो खूप लझरी आयुष्य जगत आहे.

हैदराबादमधील डॉली चायवाल्याने बिल गेट्स यांना चहा दिल्याने तो सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला. तेव्हापासून अनेक सोशल कार्यक्रमांमध्ये त्याची मागणी वाढत आहे. त्याच्या चहा करण्याच्या विशिष्ट पद्धतीमुळे तो अनेक कार्यक्रमांमध्ये आमंत्रित झाला आहे. नुकताच एका एका फूड ब्लॉगरने डॉली चायवाला एका शोसाठी किती पैसे घेतो? याचा खुलासा केला आहे.

त्या फूड व्लॉगरने डॉली चायवालाबद्दल अनेक दावे करत आहेत. त्यांनी सांगितले की, डॉली चायवालाला कार्यक्रमात आमंत्रित करण्यासाठी प्रथम त्याच्या मॅनेजरशी संपर्क साधावा लागतो. एका कार्यक्रमासाठी तो पाच लाख रुपये फी घेतात. इतकंच नाही तर तो स्वत:साठी आणि टीमसाठी पंचतारांकित हॉटेलची मागणी करतो. या व्हिडिओला अनेक लाईक्स आणि अनेक कमेंट्स येत आहे. अनेक मनोरंजक कमेंट्स ऐकून हसू आवरत नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉली चायवाला संपत्ती 10 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Gas Price: नवरात्रीआधी सर्वसामान्यांना गिफ्ट मिळणार,LPG गॅसच्या किंमती कमी होणार?

iPhone 17 साठी कायपण! मुंबईत तुफान राडा, अ‍ॅपल स्टोअरबाहेर एकमेकांना धूधू धुतलं; पाहा VIDEO

Pitru Paksha 2025: श्राद्ध करताना 'या' ५ चुका टाळा नाहीतर होऊ शकतो अनर्थ

Maharashtra Live News Update: माफी मागायचा काय विषय येत नाही, जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर पडळकर ठाम

Ajit Pawar : '...नाहीतर खुर्ची खाली करा' अजित पवारांचा नेमका रोख कुणाकडे? Video

SCROLL FOR NEXT