Naga Chaitanya SAAM TV
मनोरंजन बातम्या

Naga Chaitanya : समंथासोबतच्या घटस्फोटानंतर नागा चैतन्य अन् शोभिता धुलिपालाची लव्हस्टोरी कशी फुलली?

Naga Chaitanya Sobhita Dhulipala Love Story : समांथा रुथ प्रभूसोबतच्या घटस्फोटानंतर नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाची लव्हस्टोरी कशी जुळली, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

नागा चैतन्यने शोभिता धुलिपालासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे.

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांनी 2024 मध्ये डिसेंबर महिन्यात लग्नगाठ बांधली.

समंथासोबतच्या घटस्फोटानंतर नागा चैतन्यने शोभितासोबत लग्न केले.

साऊथ सुपरस्टार नागा चैतन्य (Naga Chaitanya) कायम आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. त्याने 2024 मध्ये डिसेंबर महिन्यात शोभिता धुलिपालासोबत ( Sobhita Dhulipala) लग्नगाठ बांधली. लग्नापूर्वी नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला खूप वेळ एकमेकांना डेट करत होते. नुकत्याच एका मिडिया मुलाखतीत नागा चैतन्य याने आपली लव्ह स्टोरी सांगितली आहे. नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला साऊथ इंडस्ट्रीतील क्युट कपल आहे.

पहिल्या भेटीचा किस्सा

जगपति बाबू यांच्या झी ५ टॉक शोमध्ये नागा चैतन्यने शोभिता आणि त्याची लव्ह स्टोरी सांगितली आहे. ज्यात त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा देखील सांगितला आहे. नागा चैतन्यने सांगितल्यानुसार नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाची प्रेमकथेला इन्स्टाग्रामवर सुरुवात झाली. एका इमोजीमुळे दोघं एकमेकांशी बोलू लागले. नागा चैतन्य म्हणाला, "मी आणि शोभिता इन्स्टाग्रामवर भेटलो. मला वाटले नव्हते की आयुष्याचा जोडीदार मला येथे भेटेल. एकदा क्लाउड किचन बद्दल पोस्ट केली. तेव्हा तिने इमोजी शेअर करून कमेंट केली. तेव्हापासून तिच्याशी बोलू लागलो आणि भेटलो. "

नागा चैतन्य-शोभिता धुलिपाला

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाने 4 डिसेंबर 2024 मध्ये लग्नगाठ बांधली. नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा लग्न सोहळा हैदराबादमध्ये पार पडला. या सोहळ्याला इंडस्ट्रीतील दिग्गज मंडळी उपस्थित होती. हे लग्न पारंपरिक पद्धतीने पार पडले. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले.

नागा चैतन्य- समांथा रुथ प्रभू

नागा चैतन्यचे हे दुसरे लग्न आहे. त्याने या आधी समांथा रुथ प्रभूशी लग्न केले होते. नागा चैतन्य आणि समांथा रुथ प्रभूने 2017मध्ये लग्नगाठ बांधली मात्र 2021 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. अवघ्या 4 वर्षात त्यांचा संसार मोडला. समांथा रुथ प्रभूसोबतच्या घटस्फोटानंतर नागा चैतन्य शोभिता धुलिपालाला डेट करू लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजपचा शरद पवार आणि काँग्रेसला दणका; आमदाराच्या मुलासह बड्या नेत्यांनी हाती घेतलं कमळ

Amboli Tourism : 'आंबोली'ला गेल्यावर काय काय पाहाल? पटकन नोट करा सुंदर ठिकाणांची नावे

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणीला दिवाळीचा हप्ता कधी येणार?

Wednesday Horoscope : व्यवसायात नवीन भागीदारी टाळा; बँकतील नोकरदारांसाठी तणावाचा दिवस, वाचा बुधवारचे राशीभविष्य

Crime News : डिलिव्हरी बॉक्स अन् बनावट बारकोड; कंपन्यांची लाखोंची फसवणूक करणाऱ्यांचं हरियाणा कनेक्शन उघड

SCROLL FOR NEXT