Naga Chaitanya  Instagram @chayakkineni_official
मनोरंजन बातम्या

Naga Chaitanya Wedding: सामंथाशी घटस्फोट घेतल्यानंतर पुन्हा बोहल्यावर चढणार नागा चैतन्य? चर्चांना उधाण

Naga Chaitanya Getting Married: अभिनेता लवकरच दुसरे लग्न करणार आहे.

Pooja Dange

Naga Chaitanya With Rumored Girlfriend Sobhita Dhulipala:

सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य नेहमीच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. नागा चैतन्य आणि सामंथा यांनी लग्नाच्या ४ वर्षांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घटस्फोटच्या नेमकं कारण दोघांपैकी कोणीही स्पष्टपणे सांगितले नाही.

अभिनेता नागा चैतन्यने त्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेता लवकरच दुसरे लग्न करणार आहे.

न्यूज १८ने दिलेल्या वृत्तानुसार नागार्जुन, नागा चैतन्यचे लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. नागार्जुन यांनी मुलाच्या लग्नासाठी मुलगी शोधली असून ती एका मोठ्या व्यावसायिक कुटुंबाशी संबंधित आहे. परंतु नागार्जुनच्या कुटूंबाने अद्याप या वृत्तविषयी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

नागा चैतन्य आणि समांथा प्रभू यांच्या नात्याविषयी बोलायचे झाले तर दोघे एका चित्रपटाच्या सेटवर भेटले. २०२७ साली नागा चैतन्य आणि समांथा यांचा विवाह झाला. लग्नाच्या ४ वर्षांनी या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने त्यांच्या चाहत्यांसह सर्वांनाच धक्का बसला. (Latest Entertainment News)

घटस्फोटानंतर नागा चैतन्यचं नाव लगेच अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी जोडण्यात आले. त्यांच्या डेटिंग आणि रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आले होते. नागा चैतन्य आणि शोभिताने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT