Naga Chaitanya And Sobhita Dhulipala  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Naga Chaitanya Wedding Card: नागा चैतन्य अन् शोभिता धुलिपाला यांची लग्नपत्रिका व्हायरल; 'या' दिवशी घेणार सातफेरे

Naga Chaitanya And Sobhita Dhulipala: अभिनेत्री शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य त्यांच्या पर्सनल लाईफमुळे सध्या चर्चेत आहेत.

Manasvi Choudhary

अभिनेत्री शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य त्यांच्या पर्सनल लाईफमुळे सध्या चर्चेत आहेत. सध्या या दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. मागील महिन्यापासून या दोघांच्या प्री- वेडिंग कार्यक्रमांना सुरूवात झाली आहे. हे दोघेही डिसेंबरमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाच्या निमंत्रण पुत्रिकेचे फोटो व्हायरल झाले आहेत.

सोशल मीडियावर समोर आलेल्या नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाच्या पत्रिकेवर भारताच्या दक्षिण भागातील पारंपारिक संस्कृतीचा समावेश आहे. पत्रिकेवर मंदिर, दिवे, गाय आणि घंटा दिसत होत्या. वधू-वरांच्या नावासोबत त्यांच्या कौटुंबिक तपशीलांचाही समावेश होता. लग्नाची तारीख ४ डिसेंबर २०२४ आहे. हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. सध्या सोशल मीडियावर नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली आहे.

बरेच महिन्यांपासून नागा चैतन्य आणि शोभिता यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आले. यानंतर या दोघांनीही अधिकृतपणे त्याचा नात्याची कबुली दिली. ८ ऑगस्टला या दोघांनीही साखपरपुडा करत चाहत्यांना माहिती दिली. लवकरच हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत.

दरम्यान, याआधी नागा चैतन्यने २०१७ मध्ये समांथा रूथ प्रभूसोबत लग्न केले होते. २०२२ मध्ये या दोघांच्याही नात्यात दुरावा निर्माण झाला. दोघांनीही घटस्फोट घेतला. संमाथा आणि नागा चैतन्य एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतर नागा चैतन्य आता दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT