Naga Chaitanya Sobhita Dhulipala Love Story Saam Tv
मनोरंजन बातम्या

Naga Chaitanya And Sobhita Love Story : पहिली भेट कुठं, प्रेम कसं फुललं? नागा चैतन्य अन् शोभिताची लव्हस्टोरी Revealed

Naga Chaitanya Sobhita Dhulipala Love Story : २०२२ पासून टॉलिवूड अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आता खऱ्या ठरल्या आहेत. नागा चैतन्य आणि शोभिताने आज गुपचूप साखरपुडा आटोपला.

Chetan Bodke

२०२२ पासून टॉलिवूड अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आता खऱ्या ठरल्या आहेत. नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांनी आज (८ एप्रिल) हैदराबादमधील नागार्जुनच्या घरी गुपचूप साखरपुडा आटोपला. साखरपुड्याचे फोटो स्वत: नागार्जुन यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला एकमेकांना डेट करीत आहेत.

नागा चैतन्यचं हे दुसरं लग्न आहे. अभिनेत्याने पहिलं लग्न अभिनेत्री समंथा रुथ प्रभूसोबत केले. दोघांनीही २०१७ मध्ये लग्न केले. त्यानंतर त्यांचे चार वर्षच लग्न टिकले. पण लग्नाच्या चार वर्षांनंतर त्यांच्यात मतभेद सुरू झाले आणि नागा चैतन्य आणि समांथाने ऑक्टोबर २०२१ मध्ये वेगळा होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघांनीही आपआपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर समंथा एकटीच राहत आहे. तर नागाचैतन्य शोभिता धुलिपालासोबत संसार थाटण्याची तयारी करत आहे.

२०२२ पासून नागा चैतन्य आणि शोभिता एकमेकांना डेट करीत आहेत. त्यासोबतच ते अनेकदा कॅमेऱ्यासमोर एकत्र स्पॉटही झाले होते. तेव्हापासून नागा चैतन्य आणि शोभिता एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. पण दोघांनीही डेटिंगच्या चर्चांबद्दल उघडपणे भाष्य केले नाही. नागा चैतन्यचा समंथासोबत घटस्फोट झाल्यानंतर नागा चैतन्य शोभिताला डेट करू लागला होता.

शोभिता हैद्राबादमध्ये 'मेजर' चित्रपटाचे प्रमोशन करत होती. त्यावेळी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता नागाचैतन्यही आला होता. त्याच दरम्यान, अभिनेत्रीचा वाढदिवसही होता. नागाचैतन्यने त्यावेळी शोभिताचा वाढदिवस काही मित्रमंडळींसोबत सेलिब्रेट केला. त्या दरम्यान त्यांची मैत्री खूप चांगली झाली होती. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. तेव्हापासूनच त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना सुरूवात झाली.

२०२२ मध्ये अनेकदा नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला रिलेशनमध्ये असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मार्च २०२३ मध्ये नागा चैतन्य आणि शेफ सुरेंद्र मोहन यांचा लंडनच्या रेस्टॉरंटमधील फोटोत शोभिता दिसल्यानंतर पुन्हा एकदा ते एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा झाल्या होत्या. फोटोमध्ये पाठीमागे शोभिता टेबलवर बसलेली दिसत आहे. पण, नंतर तो फोटो शेफने डिलिट केले.

त्यानंतर ते अनेक ठिकाणी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी एकत्र जाऊ लागले. अशापद्धतीने त्यांची लव्हस्टोरी चर्चेत राहिली आहे. गुपचूप एकमेकांना डेट करणारं हे कपल अखेर आज एंगेज झालं आहे. मिडिया रिपोर्टनुसार,२०२४च्या शेवटी हे कपल लग्नबंधनात अडकणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

SCROLL FOR NEXT